
नुकतेच सिने दिग्दर्शक आणि निर्माते बोनी कपूर यांची कन्या, अंशुला कपूरचा विवाह रोहन ठक्कर यांचा विवाह पार पडला. अतिशय दणक्यात पार पडलेल्या या लग्नसोहळ्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंबीय आणि मित्रपरिवाराची उपस्थिती पाहायला मिळाली. या सगळ्या सोहळ्यात जान्हवी कपूरच्या लूकची चर्चा रंगली. बहिणीच्या रिसेप्शनमध्ये जान्हवीने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली सिल्क साडी नेसली होती, ज्यासोबत तिने स्ट्रॅपलेस ब्लाउज परिधान केला होता. तिच्या या मोहक लूकचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. दरम्यान, तिने तिच्या मेहंदीने सर्वांना आश्चर्यचकित केले. तिच्या मेहंदीमध्ये ‘शिखू’ हे नाव दिसत होते. जान्हवीने या कार्यक्रमातील अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंमध्ये तिच्या मेहंदीवर ‘शिखू’ हे नाव लिहिलेले दिसत होते, जे तिचा प्रियकर शिखर पहारियाचे टोपणनाव आहे.
जान्हवी आणि शिखरची लव्हस्टोरी
मिळालेल्या वृत्तांनुसार, जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. त्यांच्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रूपांतर झाले. त्यांच्या नात्याची बातमी 2016 मध्ये समोर आली, परंतु जान्हवीच्या ‘धडक’ चित्रपटानंतर 2018 मध्ये त्यांच्या विभक्त होण्याची बातमी समोर आली. मात्र, 2023 मध्ये, हे दोघे पार्ट्यांमध्ये, सुट्ट्यांमध्ये, अनंत अंबानींच्या लग्नसमारंभात आणि मंदिरांमध्ये अनेक वेळा एकत्र दिसले होते. यामुळे चाहत्यांना वाटले की ते पुन्हा एकत्र आले आहेत. ते तिरुपती मंदिरातही अनेकदा एकत्र दिसले होते.
View this post on Instagram
जान्हवीने शिखरवरील तिच्या प्रेमाबद्दल संकेत देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, 2024 मध्ये, ‘मैदान’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी ती ‘शिखू’ नावाचा नेकलेस घातलेली दिसली होती. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात, तिने चुकून तिच्या स्पीड डायलवर शिखरचे नाव घेतले, ज्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना आणखी बळ मिळाले. शिखर पहाडिया हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू आहेत. ते उद्योजिका स्मृती शिंदे आणि व्यावसायिक संजय पहाडियाचे पुत्र आहेत. शिखर एक उद्योजक आहे. आता ते लवकरच विवाहबंधात अडकतील असे म्हटले जात आहे.
Leave a Reply