
केंद्र सरकारने पंतप्रधान जन धन योजना (PMJDY) सुरू केली होती. या योजनेची देशभरात चर्चा झाली. आजघडीला या योजनेअंतर्गत कोट्यवधी बँक खाते खोलण्यात आले. दुर्गम भागातील तसेच ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली होती. दरम्यान, आता याच योजनेबाबत अचंबित करणारी माहिती समोर आली आहे.
5.72 कोटी बँक खात्यांमध्ये शून्य पैसे
समोर आलेल्या माहितीनुसार जन धन योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या प्रत्येक चौथ्या खात्यामधील एक खाते हे निष्क्रीय आहे. एवढंच नव्हे तर 5.72 कोटी बँक खात्यांमध्ये शून्य पैसे आहेत. आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी वित्त मंत्रालयाकडे आरटीआय दाखल केला होता. या आरटीआयअंतर्गत जन नध बँक खात्याच्या सद्यस्थितीबाबत माहिती विचारण्यात आली होती. या आरटीआयतून समोर आलेल्या माहितीनुसार 12 ऑगस्ट 2026 पर्यंत 59,03,74,907 कोटी जन धन खाते आहेत. या सर्व बँक खात्यांमध्ये एकूण 3.15 लाख कोटी रुपयांची बचत होती. यातील 32.89 कोटी बँक खाते हे महिलांच्या नावाने आहेत. तर 26.14 कोटी खाते हे पुरुषांचे आहेत.
15,36,77,009 बँक खाते हे निष्क्रिय
आरटीआयच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार 5,72,35,490 बँक खात्यात झिरो बॅलेन्स होते. तर 15,36,77,009 बँक खाते हे निष्क्रिय होते. ही आकडेवारी समोर आल्यानंतर जन धन योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात बँक खाते सुरू करण्यात आले. परंतु यातील कोट्यवधी बँक खाते हे निष्क्रिय आहेत.
महाराष्ट्रात 36.04 लाख बँक खात्यात शून्य रक्कम
पंतप्रधान जन धन योजनेची सुरुवात ऑगस्ट 2014 मध्ये करण्यात आली होती. देशातील प्रत्येक कुटुंबापर्यंत बँकिंग सेवा पोहोचवणे हा या योजनेमागचा उद्देश होता. दरम्यान, उत्तर प्रदेश राज्यात एकूण 95.92 लाख बँक खाते हे झिरो बॅलेन्स खाते आहेत. बिहारमध्ये अशा खात्यांची संख्या 62.35 लाख आहे. पश्चिम बंगालमध्ये ही संख्या 37.20 लख एवढी आहे. महाराष्ट्रात 36.04 लाख बँक खाते हे झिरो बॅलेन्स आहेत. निष्क्रिय बँक खात्यांच्या बाबतीतही उत्तर प्रदेश राज्य सर्वात पुढे आहे.
Leave a Reply