• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026, RCB vs GT Qualifier 1: कागिसो रबाडाने 25वी विकेट घेत रचला इतिहास, असं पहिल्यांदाच घडलं

May 26, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून गुजरातने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या सामन्यातील दुसऱ्या षटकात कागिसो रबाडाने विक्रमाची नोंद केली. (Photo: IPL/BCCI)

कागिसो रबाडा वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी आला. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने वेंकटेश अय्यरची विकेट काढली. या विकेटसह कागिसो रबाडाने विक्रम नोंदवला. आयपीएल स्पर्धेच्या तीन पर्वात 25हून अधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. (Photo: IPL/BCCI)

कागिसो रबाडाने 2019 मध्ये 25 विकेट घेतल्या होत्या. त त्यानंतर 2020-21 च्या आयपीएल हंगामात 30 बळी घेतले होते. आता या पर्वात 25 विकेटची नोंद केली आहे. रबाडाच्या आधी हा विक्रम ड्वेन ब्राव्होच्या नावावर होता, त्याने ही कामगिरी दोनदा केली होती. (Photo: IPL/BCCI)

कागिसो रबाडाने एकाच आयपीएल हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा पराक्रमही केला आहे. या हंगामात रबाडाने पॉवरप्लेमध्ये 18 बळी घेत एक विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी 2023 मध्ये मोहम्मद शमीने पॉवरप्लेमध्ये 17 बळी घेतले होते. तर 2013 मध्ये मिचेल जॉन्सनने 16 बळी घेतले होते. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल 2026 च्या पर्पल कॅपच्या शर्यतीत कागिसो रबाडा सध्या अव्वल स्थानी आहे. त्याने 25 बळी घेतले आहेत, मात्र 24 बळी घेणारा आरसीबीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार त्याच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे आता या शर्यतीत पुढे कोण जाणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. (Photo: IPL/BCCI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मी आता जास्त काम करु शकत नाही, नितीन गडकरी यांचं मोठं विधान; नेमका अर्थ काय?
  • Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष
  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in