• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 Final: साई सुदर्शन दोनदा हिट विकेट, तिसऱ्यांदा असं होऊ नये म्हणजे झालं! Video

May 30, 2026 by admin Leave a Comment

Sai Sudharsan Hit Wicket: आयपीएल 2026 स्पर्धेत काही घडामोडी विचित्र आणि पहिल्यांदाच घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. साई सुदर्शनसोबत असंच घडलं आहे. कारण सलग दोन सामन्यात हिट विकेट होत त्याला मैदान सोडावं लागलं आहे. धर्मशाळा येथे क्वॉलिफायर 1 सामन्यात आरसीबीविरुद्ध आणि क्वॉलिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध हिट विकेट झाला होता. त्यामुळे हिट विकेट आणि साई सुदर्शन हे समीकरण ठरलं आहे. अशा पद्धतीने काही खेळाडू बाद झाले आहेत. त्यामुळे तशा पद्धतीने बाद होणं हे काय नवीन नाही. पण साई सुदर्शन ज्या पद्धतीने बाद झाला हे पाहताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण दोन्ही वेळेस हातातून बॅट निसटली आणि थेट स्टंपवर आदळली. आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएल 2026 स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात तशाच पद्धतीने बाद झाला तर हॅटट्रीक नोंदवली जाईल.

साई सुदर्शनने या विकेटसह एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पुरूष टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक हिट विकेट होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. या यादीत आंद्रे रसेल आणि शोएब मलिक यांचाही समावेश असून तीन वेळा हिट विकेट झाले आहेत. साई सुदर्शन आयपीएलमध्ये तीन वेळा हिट विकेट झाला हे विशेष.. आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा हिट विकेट झाला होता.

Sai Sudharsan-ಗೆ ಇತಿಹಾಸದಲ್ಲೇ ಅತ್ಯಂತ ದುರಾದೃಷ್ಟಕರ Dismissal! 😲💔

ಕೈಯಿಂದ ಬ್ಯಾಟ್ ಜಾರಿ ವಿಕೆಟ್‌ಗೆ ಬಿದ್ದ ಆ ಶಾಕಿಂಗ್ ಕ್ಷಣ ಇಲ್ಲಿದೆ ನೋಡಿ!👀

ವೀಕ್ಷಿಸಿ | #TATAIPL 2026, Qualifier 1 👉 #RCBvsGT | LIVE NOW | ನಿಮ್ಮ Star Sports ಕನ್ನಡ & JioHotstar ನಲ್ಲಿ. pic.twitter.com/GJv0YawDvd

— Star Sports Kannada (@StarSportsKan) May 26, 2026

THE RAREST OF RARE DISMISSALS!
TWICE IN TWO INNINGS 😯😯

Sai Sudharsan’s bat fell onto his own stumps 🫣

Updates ▶ https://t.co/eupS8cBPc2#TATAIPL | #Qualifier2 | #TheFinalLeap | #GTvRR pic.twitter.com/htGSYpu3YH

— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2026

काय म्हणाले टॉम मूडी?

साई सुदर्शन सलग 2 सामन्यात हिट विकेट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे त्याला अशा पद्धतीने बाद होताना पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे. टॉम मूडी यांनी सांगितलं की, यापूर्वी असं कधीच पाहिलं नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by ESPNcricinfo (@espncricinfo)

साई सुदर्शन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत

साई सुदर्शन ऑरेंज कॅपच्या शर्यती आहे. त्याने 16 सामन्यात 710 केल्या आहेत. वैभव सूर्यवंशी 776 धावांसह पहिल्या स्थानावर आहे. तर शुबमन गिल 722 धावांसह दुसऱ्या आणि साई सुदर्शन तिसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीकडून विराट कोहली 600 धावांसह सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे शतक ठोकलं तरी या दोघांना मागे टाकू शकणार नाही. त्यामुळे ऑरेंज कॅप एक तर शुबमन गिल किंवा साई सुदर्शनला मिळू शकते.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • India-UAE Defence Deal : अमेरिका असमर्थ ठरली म्हणून भारताकडे आले पण भारतही तो पर्यंत UAE ला ब्रह्मोस नाही विकू शकणार
  • Ketan Agarwal Death : मला का सोडून गेलास ? केतन अग्रवालच्या हत्येनंतर अटक, सिया गोयलची भावनिक पोस्ट पुन्हा चर्चेत
  • Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, 10 ग्रॅमसाठी…
  • भाड्याच्या छोट्याशा खोलीतून आज..; 25 व्या वर्षी ‘बिग बॉस मराठी’ फेम अनुश्री मानेनं घेतलं हक्काचं घर
  • बंडखोर खासदारांच्या खासदारकीची प्रक्रिया पुर्ण होऊच शकत नाही’, बड्या नेत्याचं खळबळजनक विधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in