• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 स्पर्धेचं जेतेपद मिळवताच आरसीबी मुंबई इंडियन्स आणि सीएसकेच्या पंगतीत बसणार, जाणून घ्या

May 30, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेचा 74वा अर्थात अंतिम सामना 31 मे रोजी होत आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. दोन्ही संघांनी यापूर्वी स्पर्धेत एक जेतेपद मिळवलं आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची संधी आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे जेतेपदाची ट्रॉफी कोण उचलणार? याची उत्सुकता आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्त्वात आरसीबी संघ आपलं विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करेल. मागच्या पर्वात आरसीबीने पहिल्यांदा जेतेपदाला गवसणी घातली होती. आता आरसीबीकडे सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची संधी आहे. 18 वर्षानंतर जेतेपद मिळवल्यानंतर सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याचा योग आहे. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकून इतिहास रचू शकते.

आरसीबीकडे मोठी संधी

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सलग दोन वेळा जेतेपद मिळवण्याचा मान हा चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सला मिळाला आहे. आता ही संधी आरसीबीकडे आहे. सलग दोन ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळाल्यास तिसरा संघ ठरू शकतो. चेन्नई सुपर किंग्सने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2010 आणि 2011 मध्ये सलग जेतेपद मिळवलं होतं. तर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वात 2019 आणि 2020 मध्ये सलग जेतेपदाला गवसणी घातली होती. आरसीबीने 2025 साली पहिल्यांदा जेतेपद मिळवलं होतं. आता अंतिम फेरी गाठली असून दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची शक्यता आहे.

गुजरात टायटन्सच्या कामगिरीकडे  लक्ष

गुजरात टायटन्स संघ देखील दुसऱ्या जेतेपदावर लक्ष ठेवून आहे. गुजरात टायटन्सने 2022 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 2023 सलग जेतेपदाची संधी चालून आली होती. पण अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सकडून पराभूत झाले. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सच्या पंगतीत बसण्याची संधी हुकली होती. दरम्यान, क्वॉलिफायर 1 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 92 धावांनी पराभूत केलं होतं. आता पुन्हा एकदा हे आमनेसामने येणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Girija Oak : गिरिजाला सर्वकाही संपल्यासारखं वाटलं तेव्हा…, आई झाल्यानंतर अभिनेत्रीला बसलेला मोठा धक्का, पहिल्यांदाच म्हणाली…
  • ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदेंचे थेट आदेश..
  • Aaditya Thackeray : फेकनाथ मिंधे..सगळे रात्रीचे खेळ..आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंच्या जिव्हारी लागणारे शब्द
  • पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्… पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजेंबाबत मोठं विधान; महायुतीत आता…
  • किसिंग सीन दरम्यान 20 वेळा रिटेक, रागात नंतर अभिनेत्रीने जे केलं ते ऐकून व्हाल थक्क

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in