• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

INDW vs NEDW : वुमन्स टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, नेदरलँड्सचा 95 धावांनी धुव्वा

June 17, 2026 by admin Leave a Comment


आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियाने विजयी घोडदौड यशस्वीरित्या कायम राखली आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात सलग आणि एकूण दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने नेदरलँड्सवर 95 धावांनी मात केली आहे. भारताने शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या दोघींनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर नेदरलँड्ससमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर नेदरलँड्सला संपूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारताने नेदरलँड्सला 17.3 ओव्हरमध्ये 114 धावांवर गुंडाळलं. भारताने यासह 2 गुणांची कमाई केली आणि सामना जिंकला.

भारताची बॅटिंग

नेदरलँड्सने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताने या संधीचं सोनं केलं. भारताने या स्पर्धेतील आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. तसेच भारताने स्पर्धेत पहिल्यांदाच 200 पार मजल मारली. भारताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 209 धावा केल्या. उपकर्णधार स्मृती मंधाना हीने सर्वाधिक 74 धावा केल्या. तर शफालीने 55 रन्स केल्या. तर इतरांनीही योगदान दिलं. त्यामुळे भारताला 200 पार पोहचता आलं.

नेदरलँड्सचा 95 धावांनी धुव्वा

नेदरलँड्सच्या पहिल्या 4 फलंदाजांनी विजयी धावांचा पाठलाग करताना ठीक सुरुवात केली. नेदरलँड्सच्या पहिल्या 4 फलंदाजांनी दुहेरी आकड्यात धावा केल्या. मात्र यापैकी एकीलाही 30 पार पोहचता आलं नाही. तर भारतीय गोलंदाजांनी इतर उर्वरित फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठून दिला नाही.

श्री चरणीचा विकेट्सचा चौकार

टीम इंडियासाठी श्री चरणी हीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. श्रीने या 4 पैकी 3 विकेट्स या एकाच ओव्हरमध्ये घेतल्या. शफाली वर्मा हीने तिघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. नंदनी शर्माने 2 विकेट्स मिळवल्या. तर दीप्ती शर्मा हीने 1 विकेट घेत योगदान दिलं.

टीम इंडियाचा सर्वात मोठा विजय

दरम्यान टीम इंडियाचा हा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील धावांबाबत सर्वात मोठा विजय ठरला. भारताने याआधी श्रीलंकेवर दुबईत 2024 साली 82 धावांनी मात केली होती.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास
  • Khawadya Dongar : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी… कुणालच्या वडिलांच बायको संगिताला नेमकं काय खटकलं? आत्याचा मोठा खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in