
ट्राय नॅशन ए सीरिज 2026 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने असणार आहेत. टीम इंडियाचा हा मालिकेतील दुसरा तर अफगाणिस्तानचा पहिला सामना असणार आहे. तिलक वर्मा याच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा असणार आहे. तर इम्रान मीर अफगाणिस्तानचं कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना कधी?
इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना गुरुवारी 11 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.
इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना कुठे?
इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना दांबुल्यातील रनगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. तर 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.
इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.
Leave a Reply