• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SL Test: गॉल कसोटीपूर्वी भारतीय फलंदाजांना हवेचा इशारा! गिलसेनेसमोर मोठं आव्हान

August 12, 2026 by admin Leave a Comment


श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी आता फक्त दोन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. यासाठी टीम इंडियाने कसून सराव केला आहे. पण या सामन्यात भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार यात काही शंका नाही. एक तर भारतीय संघ श्रीलंकेत 9 वर्षांनी कसोटी मालिका खेळत आहेत. त्यामुळे संघातील अनेक खेळाडू या ठिकाणी पहिल्यांदाच खेळणार आहेत. फक्त तीन खेळाडूच मागच्या वेळी कसोटी सामना खेळले आहेत. त्यामुळे श्रीलंकेतील परिस्थितीचा बऱ्याच खेळाडूंना अनुभव नाही. त्यामुळे या स्थितीचा सामना करणं थोडं कठीणच जाणार आहे. गॉल क्रिकेट ग्राउंडमध्ये पहिला कसोटी सामना होणार आहे. या मैदानात हवा हा देखील फॅक्टर आहे. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी मोठं आव्हान असणार आहे.

वाऱ्याचा वेग आणि फलंदाजी!

टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलसह इतर काही खेळाडू श्रीलंकेत वनडे आणि टी20 सामने खेळले आहेत. पण रेड बॉल क्रिकेटचा अनुभव कोणाकडेच नाही. त्यात गॉलमध्ये कसोटी सामना खेळताना एक वेगळंच आव्हान असणार आहे. मग आता प्रश्न पडतो की हवेमुळे काय होऊ शकतं? तर गॉल मैदानाच्या भौगोलिक स्थितीमुळे तुम्हाला त्याचा अंदाज येईल. गॉल हे हिंद महासागराच्या किनाऱ्यावर वसलं आहे. स्टेडियमच्या दोन्ही बाजू समुद्राने वेढलेल्या आहेत. या स्टेडियममधील स्थिती भारतातील इतर कोणत्याही स्टेडियमपेक्षा वेगळी आहे. चार बाजूंना काही मोठे स्टँड नाहीत, तर एक मोठा भाग मोकळा आहे. त्यामुळे समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम होतो. वाऱ्याचा फिरकी गोलंदाजांवर अधिक परिणाम होतो.

गॉलची स्थिती काय?

श्रीलंकेचा माजी अष्टपैलू खेळाडू फरवीझ महरूफ यांनी सांगितलं की, ‘वारा आमचं प्रमुख अस्त्र आहे. आम्ही त्याला गॉलचा राजा म्हणतो. त्याने येथे बरेच बळी घेतले आहेत. वाऱ्याच्या दिशेने गोलंदाजी कशी करायची हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे गॉलमध्ये वारा हा प्रमुख घटक असेल. गोलंदाज वाऱ्याचा वापर करून चेंडूला वळण देऊ शकतात.’ भारतीय गोलंदाजांना त्याचा फायदा होईल का? त्यावर त्यांनी सांगितलं की, दोन्ही दिशांना जोरदार वारे वाहतात. त्यामुळे भारतीय फिरकी गोलंदाजांना त्याचा अंदाज झटपट घ्यावा लागेल. वाऱ्याशी किती जुळवून घेतात, त्यानुसार ते ठरेल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MPSC पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, थेट अपर सचिवांना अटक; धक्कादायक खुलासे होणार?
  • Nepal Flood: नेपाळमध्ये पूराचा हाहाकार, गावची गावं वाहून गेली, पत्त्यांप्रमाणे कोसळल्या इमारती, धडकी भरवणारे व्हिडीओ समोर!
  • हवेच्या वेगाने पाणी आलं अन् सर्वच वाहून नेलं… पावसाचा थेंबही नाही, तरीही नेपाळमध्ये जलप्रलय Video
  • Viral Video : मांजरीला वाचवायला गेली दोन छोटी मुलं, काय घडलं बघा
  • तर मी मरून जाईन, कोणासोबतच इंटिमेट होऊ शकत नाही, अभिनेत्रीने पहिल्यांदाच हकिकत सांगितली; त्या आरोपांवर स्पष्टीकरण!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in