• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs IRE: आयर्लंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीचा झंझावात कुठे पाहता येणार, आणि किती वाजता सामना सुरु होणार? पाहा Schedule

June 25, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट संघात सध्या युवा फलंदाजांना समावेश वाढला आहे. टीम  इंडिया आपल्या युवा खेळाडूंमुळे सातत्याने नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ज्या गतीने क्रिकेट खेळले आहे, तीच गती पुढे नेण्याची जबाबदारी आता मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आली आहे. श्रेयसला टी-20 संघाचा कर्णधार केला असून आता त्याच्या नेतृत्त्वाखाली संघ आयर्लंड आणि इंग्लंड मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.  भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. कर्णधार श्रेयस अय्यर या दौऱ्याद्वारे आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची नवी सुरुवात करणार आहे. क्रिकेट चाहते युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीबद्दल खूप उत्सुक आहेत.

भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यांच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाल्यास, आयर्लंडने भारताविरुद्ध एकही आंतरराष्ट्रीय सामना जिंकलेला नाही. भारत आणि आयर्लंड यांच्यात 2009 पासून टी-20 सामने खेळले गेले आहेत आणि 2026 पासून या दोन संघांमध्ये एकूण आठ सामने खेळले गेले आहेत. भारतीय संघाने हे सर्व आठही सामने जिंकले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या आठ सामन्यांपैकी सहा सामने आयर्लंडच्या भूमीवर खेळले गेले आहेत. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरवर हा विजयी विक्रम कायम ठेवण्याचा दबाव आणि जबाबदारी दोन्ही असेल.

भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल. दोन्ही सामने सुंदर बेलफास्ट क्रिकेट मैदानावर खेळले जातील. सामना आयर्लंडमधील स्थानिक वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल, पण त्यावेळी भारतात संध्याकाळ झालेली असेल. भारतीय वेळेनुसार सामना संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक संध्याकाळी 5:30 वाजता होईल.

लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकतात?

सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारतातील या मालिकेच्या टीव्ही प्रसारणाचे हक्क आहेत. तुम्ही सर्व सोनी स्पोर्ट्स चॅनेलवर सामन्याचा आनंद घेऊ शकता. जे क्रिकेट चाहते मोबाईल, लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीद्वारे सामना पाहू इच्छितात, ते सोनी लिव्ह ॲप आणि इतर अधिकृत वेबसाइट्सवर थेट प्रक्षेपणाचा आनंद घेऊ शकतात.

भारतीय टी-20 संघातील खेळाडू

श्रेयस अय्यर (कर्णधार), अक्षर पटेल, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, हर्षित राणा, प्रिन्स यादव, सुर्यांश शेडगे.

आयर्लंड टी-20 संघातील खेळाडू

लॉर्कन टकर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलानी, बेन कॅलिट्झ, टिम टेक्टर, मॅथ्यू हम्फ्रीज, रॉस अडायर, गोविन होए, लियाम मॅकार्थी, जय मुंद्रा, रुबेन विल्सन, मॅथ्यू हॉलार्ड.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shugar Rate : साखरेच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने अचानक बदलला हा नियम
  • Housewife ITR Rules: गृहिणींनाही भरावा लागणार कर? जाणून घ्या ते नियम जे 99% लोकांना माहीत नाहीत
  • चौथी पासांसाठी खुश खबर, थेट सरकारी नोकरी, मुंबई हायकोर्टातच व्हा भरती, पटापट करा अर्ज
  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं
  • Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in