• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IMD Rain Alert : नदी-नाले तुडुंब भरणार, संपूर्ण देशात पाऊस, महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा अलर्ट जारी!

August 13, 2026 by admin Leave a Comment


देशाच्या विविध भागात पावसाचा कहर पहायला मिळत आहे. हवामान विभागाने उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे आज गंगेच्या मैदानी भागातील पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडमध्ये, तर 13 आणि 14 ऑगस्ट रोजी छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उत्तर भारतातील मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 13 ते 19 ऑगस्टदरम्यान हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडमध्ये अनेक भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 14-15 ऑगस्टदरम्यान पंजाबमध्ये, 14-15 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट रोजी हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीत, 15-16 ऑगस्टदरम्यान पश्चिम उत्तर प्रदेशात, 14-18 ऑगस्टदरम्यान पूर्व उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मध्य भारतातही पावसाचा जोर वाढणार

मध्य भारतातही पावसाची जोर वाढणार आहे. 13-14 ऑगस्ट आणि 18-19 ऑगस्टदरम्यान पश्चिम मध्य प्रदेशात, तर 19 ऑगस्ट रोजी विदर्भातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 15-17 ऑगस्टदरम्यान पश्चिम मध्य प्रदेशात, 13-19 ऑगस्टदरम्यान छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशात, तर 13-18 ऑगस्टदरम्यान विदर्भात अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, 16-17 ऑगस्टदरम्यान पश्चिम मध्य प्रदेशात, 15-17 ऑगस्टदरम्यान पूर्व मध्य प्रदेशात आणि 15 ऑगस्ट रोजी छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अंदमान-निकोबार, बिहार आणि झारखंडमध्येही पाऊस कोसळणार

13 ते 19 ऑगस्ट म्हणजेच पुढील सात दिवस अंदमान आणि निकोबार बेटे, गंगेच्या मैदानी भागातील पश्चिम बंगाल, झारखंड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 17-18 ऑगस्टदरम्यान बिहारमध्ये आणि 13-15 ऑगस्टदरम्यान ओडिशातही अनेक भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूरमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट

ईशान्य भारतातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 13 ते 19 ऑगस्टदरम्यान अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये अनेक भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 13-17 ऑगस्टदरम्यान अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात, तर 13-16 ऑगस्टदरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह वीज पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kriti Sanon : फिल्मी पडद्यावरच नाही, कमाईतही ‘हिट’; क्रिती सेननची कमाई नेमकी किती? संपत्तीचा आकडा थक्क करणारा
  • सून बायसेक्शुअल असल्याचं कळल्यावर गौरव खन्नाच्या आई-वडिलांनी काय केलं? आकांक्षा चमोला म्हणाली…
  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in