
बॉलिवूडचा ग्रीक गॉड अशी ओळख असलेला सुपरस्टार, अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan ) हा त्याच्या कामामुळे, चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असतो. मात्र यावेळेस तो चर्चेत आलाय तो त्याच्या मुलामुळे. हृतिकचा मुलगा रेहान रोशन याने संगीताच्या दुनियेत पाऊल टाकलं आहे. ‘धिस हेवनली प्लेस’ या सिंगलसोबत रेहानने इंडिपेंडंट आर्टिस्ट म्हणून पदार्पण केलंय. त्याचं हे गाणं आता रिलीज झालं आहे. या गाण्यात तो फक्त गायक म्हणून आलेला नाही, तर त्याने या गाण्याचं लेखनही केलं असून गिटार आर्टिस्ट म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. हे गाणं सूडानने प्रोड्यूस केल्याची माहिती समोर आली आहे.
संगीताच्या क्षेत्रात रेहानचं पदार्पण
हृतिकचा मुलगा असला तरी रेहानच्या या डेब्यूचा फार गाजाावाजा करण्यात आलेला नाही. त्याचा हा डेब्यू म्युझिक व्हिडीओ खूप सिंपल आहे. ब्लँक अँड व्हाईट अशा या व्हिडीओमध्ये रेहान हा गिटार वाजवताना आणि इंग्रजीत हे गीत म्हणताना दिसलाय. रेहानच्या डेब्यूनंतर कुटुंबियांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. हृतिकने आपल्या लाडक्या लेकाच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत त्याला चिअर केलं. ‘ तुझ्यात (संगीताची) उपजत समज आहे, माझा खूप विश्वास आहे’ असं हृतिकने यासोबत लिहीलं.

आईनेही व्यक्त केलं प्रेम
हृतिकनंतर रेहानची आई सुजान खान हिनेही मुलाच्या पदार्पणाबद्दल आनंद व्यक्त करत हे खास क्षण सेलिब्रेट केलं. ‘ मी खूप भावूक झाल्ये. तुझ्यावर कितीही प्रेम केलं तरी ते कमीच..’ असं म्हणत तिने मुलाचं कौतुक केलं. तर हृतिक रोशनची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सलबा आझादनेही रेहनाला खूप शुभेच्छा दिल्यात. ‘ खूप सुंदर.. मला तुझा अभिमान वाटतो’ असं सबाने कमेंट्समध्ये लिहीलं. रेहानचे आजोबा आणि दिग्दर्शक राकेश रोशनल यांनीही नातवाचं मनापासून कौतुक केलं.
रोशन कुटुंबाचं संगीताशी जुनं नातं आहे. रेहानचे पणजोबा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध म्युझिक कंपोझर होते, तर त्याचे चुलत आजोबा म्हणजेच राकेश रोशन यांचे भाऊ, राजेश रोशन हेही प्रसिद्ध संगीतकार आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपटांना संगीत दिलंय. त्यामध्ये ‘कहो ना… प्यार है’ या हृतिक रोशनच्या डेब्यू फिल्मचाही समावेश होता. आता रेहानही गायक आणि गीतकार तसेच गिटार आर्टिस्ट म्हणून संगीताच्या दुनियेतील प्रवासासाठी सज्ज झाला आहे.
हृतिकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो ‘वॉर 2’मध्ये शेवटचा दिसला होता. रजनीकांत यांच्या आगामी ‘जेलर 2’ मध्ये त्याचा कॅमिओ असेल.
Leave a Reply