• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Horoscope Today 9th July 2026 : रखडलेली कामं मार्गी लागणार, कोणाला मिळणार सन्मान ? वाचा १२ राशींचे भविष्य

July 9, 2026 by admin Leave a Comment


मेष राशी (Aries Daily Horoscope) – काही व्यक्ती तुमच्या योजना विस्कळीत करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. शेअर बाजाराशी संबंधित लोकांनी भावनिक निर्णय घेणे टाळावे. मुलांच्या शिक्षण आणि करिअरविषयी महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील आनंदी वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. तसेच अडकलेले किंवा उधार दिलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक दिलासा मिळेल.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) – अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. घाई करण्यापेक्षा नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास यश मिळेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. सरकारी कामांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करूनच पुढे जा. एखादी जुनी बाब समोर आल्यामुळे जोडीदार नाराज होण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) – आज इतरांना मदत करताना स्वतःच्या जबाबदाऱ्यांकडेही लक्ष द्या. तुमच्या बोलण्याचा प्रभाव आज विशेष राहील, त्यामुळे शब्दांचा वापर काळजीपूर्वक करा. नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा गॅझेट खरेदी करण्याचा योग आहे. आई-वडिलांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमचा आत्मविश्वास वाढवतील.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope) – सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी मिळू शकतात. प्रभावशाली व्यक्तीची भेट भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. बराच काळ अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभाग घेतल्याने मानसिक शांतता लाभेल. मुलांच्या शिक्षणासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो

सिंह राशी (Leo Daily Horoscope) – तुमच्या नेतृत्वगुणांमुळे आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे नवीन संधी मिळू शकतात. टीमवर्कमुळे मोठी उद्दिष्टे सहज पूर्ण होतील. बढती किंवा नवीन जबाबदारीची चर्चा होऊ शकते. जोडीदारासोबत आनंददायी क्षण घालवण्याचा योग आहे.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope) – मित्रांचे सहकार्य मिळेल आणि आर्थिक नियोजनातून लाभ होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या बोलण्याला बळी पडू नका. मुलांच्या शिक्षणासंदर्भात मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. मामाच्या बाजूकडून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. जोडीदाराच्या सहकार्यामुळे आत्मविश्वास वाढेल.

तुळ राशी (Libra Daily Horoscope) – मालमत्तेशी संबंधित व्यवहारांसाठी दिवस अनुकूल आहे. भागीदारीतील व्यवसायातून चांगला लाभ मिळू शकतो. आर्थिक कामे वेगाने पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद कायम राहील. मात्र इतरांच्या वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणे टाळा.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) – आज नवीन व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नका. घाईघाईने घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरू शकतात. घराच्या सजावटीवर आणि सुखसोयी वाढवण्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी सुरू असलेली एखादी मोठी समस्या दूर होईल. आई-वडिलांचे आशीर्वाद तुमचा आत्मविश्वास वाढवतील.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) – आज तुमचा प्रभाव आणि मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. मात्र इतरांच्या कामात विनाकारण डोकं खुपसू नका. जोडीदारासोबत समन्वय राखणे महत्त्वाचे ठरेल. अनोळखी व्यक्तींच्या गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. कुटुंबातील जुनी समस्या पुन्हा समोर येऊ शकते, मात्र ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे त्यावर तोडगा निघेल. जुन्या मित्राची भेट आनंददायी ठरेल.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope) – आज कौटुंबिक आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. मुलांच्या करिअर किंवा नोकरीबाबत चिंता वाटू शकते, मात्र धीर सोडू नका. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्याने नातेसंबंध अधिक मजबूत होतील. ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवणे टाळा. आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) – आज धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये मन रमेल. प्रलंबित सरकारी कामांना गती मिळू शकते. प्रवासादरम्यान किंवा एखाद्या भेटीत मिळालेली माहिती भविष्यात लाभदायक ठरेल. आवडत्या गोष्टींवर खर्च करण्याची इच्छा होईल. वाहन चालवताना निष्काळजीपणा टाळा.

मीन राशी (Pisces Daily Horoscope) – . बराच काळ अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा मार्गी लागतील. कुटुंबात नवीन सदस्य किंवा पाहुण्याच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • धाड धाड जाणार भारतीय लोकांच्या नोकऱ्या, अमेरिकेचा H-1B व्हिसाबाबत मोठा निर्णय, थेट दिग्गज भारतीय आयटी कंपनीवर..
  • IND vs ENG: जर शक्य असेल तर… जोफ्रा आर्चरचं वैभव सूर्यवंशीला ऑपन चॅलेंज; सलग दोन विजयानंतर काय बोलला?
  • Meenakshi Sheshadri : हिंसाचाराला परवानगी पण सनी देओलसोबतच्या माझ्या Kissing सीनवर..मीनाक्षी शेषाद्रींनी जे चुकीचं वाटलं ते बोलून दाखवलं
  • जन्मदिनीच घरी पोचलं प्रसिद्ध खेळाडूचं पार्थिव, खांदा देताना भावूक सहकाऱ्यांना अश्रू अनावर
  • Farmer Loan Waiver: कर्जदार शेतकर्‍यांच्या याद्या बँकांकडून अपलोड! जमा होणार दोन लाख, आता कर्जमाफीचा मुहूर्त केव्हा?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in