
गुरुपौर्णिमेनिमित्त साईचरणी बंपर गुरूदक्षिणा येत आहे. भाविकांकडून यावर्षी कोटयवधींचे सुवर्णदान साईचरणी येत आहे. मुंबई येथील भाविकाकडून गुप्तदान करण्यात आलं आहे. या भक्ताने तब्बल 47 लाख रुपये किंमतीचा 300 ग्रॅम वजनाचा हार साई चरणी अर्पण केलाय.
आकर्षक अशी रचना आणि सुंदर नक्षिकाम असलेला सोन्याचा हार साईचरणी अर्पण करण्यात आलाय. मंगळवारी देखील साईभक्तांकडून 1 कोटी 20 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दान आले. आज 47 लाखांचा सुवर्णहार मिळून 1 कोटी 70 लाखांचे सोन्याचे अलंकार दान साईचरणी आले आहेत.
तर 642 ग्रॅम वजनाचा सुंदर नक्षिकाम असेलेला सोनेरी मुकूट देखील अर्पण करण्यात आला आहे. सोन्याच्या मुकूटाची किंमत तब्बल एक कोटी तीन लाख रुपये आहे. आंध्रपद्रेश राज्यातील वेल्लूर येथील श्रीनिवास राव यांचेकडून सोन्याचा मुकूट भेट देण्यात आलाय.
नवग्रहाची छबी आणि अमेरिकन डायमंड असलेला सुंदर नक्षिकाम केलेला सोन्याचा मुकूट गुरूदक्षिणा स्वरूपात देण्यात आला. आज दुपारच्या आरतीला भेट स्वरूपात आलेला सोन्याचा मुकूट आणि हार साईमुर्तीला हार परिधान केला जाणार..
गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक साईदर्शनासाठी येत असुन आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे…साईबाबांना गुरूस्वरूप मानून भाविक साईचरणी भरभरून दान देतायत…आज देखील कोटयवधींचे दान साईचरणी अर्पण होणार असून तिन दिवसात जवळपास साडेतीन लाख भाविक दर्शनासाठी येतील अशी अपेक्षा साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी व्यक्त केली आहे.




Leave a Reply