• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GT vs RR Qualifier 2 : वैभव सूर्यवंशीची चाबूक खेळी, आंद्रे रसेलचा महारेकॉर्ड ब्रेक

May 29, 2026 by admin Leave a Comment


वैभव सूर्यवंशी याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात अवघ्या 29 चेंडूत 97 धावांची वादळी खेळी केली होती. वैभवच्या या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सला हैदराबाद विरुद्ध एकतर्फी फरकाने विजय मिळवता आला होता. मात्र आता वैभवला क्वालिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध संघर्ष करावा लागला आहे. मात्र त्यानंतरही वैभवने दमदार अर्धशतक झळकावून राजस्थानचा डाव सावरला. वैभवने अर्धशतकी खेळीनंतर गिअर बदलला. वैभवला शतक झळकावण्याची संधी होती. मात्र वैभवचं सलग दुसऱ्या सामन्यात शतक हुकलं. वैभव एलिमिनेटर सामन्यात 97 धावांवर बाद झाला होता. तर आता वैभवने 96 रन्स केल्या. वैभवचं शतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. मात्र वैभवने मोठा विक्रम मोडीत काढला आहे. वैभवने नक्की काय केलंय? हे जाणून घेऊयात.

वैभवने गुजरात विरुद्ध 31 चेंडूत अर्धशतक केलं. त्यानंतर वैभवने टॉप गिअर टाकला. वैभवने पुढील 16 चेंडूत 46 धावा जोडल्या. वैभवने गुजरात विरुद्ध 47 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 8 फोरसह 96 धावा केल्या. वैभवने 204.26 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. वैभवने या दरम्यान आयपीएल स्पर्धेत आंद्रे रसेल याचा वेगवान 1 हजार रन्सचा रेकॉर्ड ब्रेक केला.

वेगवान 1 हजार धावा

वैभव आंद्रे रसेल याला मागे टाकत आयपीएल स्पर्धेत सर्वात कमी चेंडूत 1 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. वैभवने आंद्रे रसेल याच्या तुलनेत 105 चेंडूंआधी ही कामगिरी करुन दाखवली आहे. वैभवने 440 बॉलमध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्या. तर आंद्रे रसेल याने 1 हजार धावा करण्यासाठी 545 चेंडूंचा सामना केला होता.

आयपीएल स्पर्धेत वेगवान 1 हजार धावा करणारे फलंदाज

वैभव सूर्यवंशी : 440 बॉल

आंद्रे रसेल : 545 बॉल

टीम डेव्हिड : 560 बॉल

ट्रॅव्हीस हेड : 575 बॉल

फिल सॉल्ट : 575 बॉल

हेन्रिक क्लासेन : 594 बॉल

वीरेंद्र सेहवाग : 604



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नवे घर खरेदी करताय? मग बजेटमध्ये ‘या’ अतिरिक्त शुल्कांचा नक्की समावेश करा, नाहीतर होईल आर्थिक कोंडी
  • प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
  • चीन-पाकिस्तानला धडकी भरवणारी बातमी, अवघ्या 90 सेकंदात होणार खात्मा; भारताची मोठी योजना काय?
  • बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान…त्या विधानावर किरण पावसकरांचं शेवटी स्पष्टीकरण; म्हणाले मी कधीही…
  • पक्षप्रवेश झाला, आता पुढे काय? शिर्डीत पाय ठेवताच भाऊसाहेब वाकचौरेंनी सांगितला प्लॅन!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in