• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Govinda: कोमलसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन; म्हणाला ‘बऱ्याच गोष्टी..’

September 7, 2026 by admin Leave a Comment


Govinda: बॉलिवूडचा ‘हिरो नंबर 1’ अर्थात लोकप्रिय अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. पत्नी सुनिता अहुजाच्या वक्तव्यांमुळे गेल्या काही काळापासून त्यांच्या नात्याबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत. सुनिताने गोविंदाच्या कथित अफेअरबाबत काही गंभीर दावे केल्यानंतर आता त्याने या संपूर्ण प्रकरणावर अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत आयोजित ‘युथ शक्ती दहीहंडी’ कार्यक्रमात बोलताना गोविंदाने चाहत्यांना आपला पाठिंबा कायम ठेवण्याचं आणि त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं.

गोविंदाने या कार्यक्रमात पत्नीचं नाव घेऊन थेट आरोपांना उत्तर दिलं नाही. मात्र, त्याच्या वक्तव्याचा संबंध सध्या सुरू असलेल्या चर्चांशी जोडला जात आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक गोष्टी समोर येत असून त्यातील काही गोष्टींचं भविष्यात स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचे संकेत त्याने दिले. ‘काही गोष्टी हवेत लिहिल्या गेल्या आहेत’ अशा आशयाची टिप्पणी करत त्याने सुरू असलेल्या चर्चांवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं.

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by TNM Cinema and Beyond (@tnmentertainment_)

गोविंदाने दहीहंडीचं सांस्कृतिक महत्त्व आणि भारताच्या परंपरा पुढे नेण्याच्या जबाबदारीबद्दल बोलून आपल्या वक्तव्याची सुरुवात केली. पुढे तो म्हणाले, “जेव्हा हा उत्सव साजरा केला जातो, तेव्हा तो केवळ एक खेळ नसतो. आपण सर्वांनी आपल्या देशाचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. संपूर्ण जगात आपण कशाप्रकारे पुढे जाऊ शकतो, याचाही आपण विचार केला पाहिजे.” यानंतर त्याने स्वतःबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केलं. गोविंदा म्हणाला, “आकाशात (हवेत) अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. त्या गोष्टी स्पष्ट व्हाव्यात आणि गोविंदा त्या स्पष्ट करू शकेल, अशी मी प्रार्थना करतो.” तसेच, आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ज्यांनी आपल्याला साथ दिली, त्या चाहत्यांकडे आणि समर्थकांकडेही गोविंदाने सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. तो म्हणाले, “तुमचं सहकार्य आणि साथ मला हवी आहे.”

‘रूपा’ आणि ‘दुनियादारी’मधून कमबॅक

दरम्यान, गोविंदाच्या चाहत्यांसाठी त्याच्या कामाशी संबंधित एक आनंदाची बातमी आहे. अभिनेता ‘रूपा’ आणि ‘दुनियादारी’ या आगामी चित्रपटांमधून पुन्हा मोठ्या पडद्यावर सक्रिय होण्याच्या तयारीत आहे. ‘रूपा’मध्ये त्याच्यासोबत कोमल राणी स्वर्णकार दिसणार असल्याचं वृत्त आहे. याच चित्रपटातील सहकलाकाराच्या निमित्ताने गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चा रंगल्या होत्या.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Twinkle Khanna : पुस्तकातील मुघलांना हटवण्यापेक्षा जेवणातील कबाब हटवा; ट्विंकल खन्नाच्या पोस्टमुळे नवा वाद
  • संजय दत्तच्या मराठीवरुन शिवसेना-भाजपच्या आमदारांमध्ये जुंपली; महायुतीत नवीन वाद
  • Uddhav Thackeray : एकट्या विशाखा राऊत नाही, BMC मध्ये ठाकरेंच्या तब्बल इतक्या नगरसेवकांचं पद धोक्यात, कोण आहेत ते?
  • गोविंदाची नासाडी… अनवाणी मंदिर आणि दर्ग्यांमध्ये जायची महिला, अनेक वर्षांनंतर मोठं रहस्य समोर
  • युरोपमध्ये मोठे संकट, रशिया, अमेरिकेने वर केले हात, शेवटी भारत मदतीला धावला, बनला देवदूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in