• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Uddhav Thackeray : एकट्या विशाखा राऊत नाही, BMC मध्ये ठाकरेंच्या तब्बल इतक्या नगरसेवकांचं पद धोक्यात, कोण आहेत ते?

September 7, 2026 by admin Leave a Comment


निवृत्ती बाबर, प्रतिनिधी : नुकतचं ठाकरे गटाच्या वॉर्ड क्रमांक 191 च्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालं. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालं. शनिवारी मध्यरात्री सरकारच्या नगरविकास विभागाकडून या बाबत अधिकृत अधिसूचना जारी झाली होती. आज सोमवारी सभागृहात विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झाल्याची घोषणा होऊ शकते. विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द होणं हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे, कारण आधीच मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे गट विरोधी पक्षात आहे. त्यांच्या नगरसेवकांची संख्या 65 आहे. आता विशाखा राऊत नगरसेवक पदावरुन गेल्यामुळे ही संख्या कमी होऊन 64 झाली आहे. त्याचा परिणाम महापालिकेत पक्षाला मिळणाऱ्या काही समित्यांवर होऊ शकतो.

फक्त विशाखा राऊतचं नाही, ठाकरे गटाच्या 16 नगरसेवकांवर टांगती तलवार आहे. दोन नगरसेवकांचे पद रद्द झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या तब्बल 16 नगरसेवकांच्या विजयाला आव्हान देण्यात आलय. विशेष म्हणजे, शिंदेसेनेच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनीच या नगरसेवकांविरोधात याचिका दाखल केली आहे. जात प्रमाणपत्र, संपत्तीची माहिती आणि गुन्हेगारी प्रकरणं लपवल्याचा आरोप करत नगरसेवक पदाला आव्हान देण्यात आलय.

विशाखा राऊतांच्या आधी कोणाचं नगरसेवक पद गेलं?

निवडणूक अर्जात महत्त्वाची माहिती लपवून मतदारांची दिशाभूल केल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. यापूर्वीच प्रभाग क्रमांक 111 चे दीपक सावंत यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं. त्यानंतर प्रभाग क्रमांक 191 च्या विशाखा राऊत यांचंही नगरसेवक पद रद्द झालं. दोन पदं गेल्यानंतर आता आणखी 16 जणांचं नगरसेवकपद न्यायालयीन आव्हानाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.

ठाकरेंच्या 16 नगरसेवकांचं भवितव्य काय? याकडे मुंबईच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष

प्रभाग क्रमांक – १२१

प्रतिमा शैलेश खोपडे (शिंदे सेना) vs प्रियदर्शिनी ठाकरे (UBT) विजयी

प्रभाग क्रमांक- ६२

राजू पेडणेकर (शिंदेसेना) vs झिशान मुल्तानी (UBT) विजयी (स्वतःविषयी खोटी माहिती दिल्याचा आरोप तसंच एबी फॉर्मवर खोटी सही)

प्रभाग क्रमांक – ९३

सुमित वाजळे (शिंदेसेना) vs रोहिणी कांबळे (UBT) विजयी

प्रभाग क्रमांक – १२

सुवर्णा गावस (शिंदेसेना) vs सारिका झोरे (UBT) विजयी

प्रभाग क्रमांक – ७३

दीप्ती पोतनीस (शिंदेसेना) vs लोना रावत (UBT) विजयी (संपत्ती लपवल्याचा आरोप)

प्रभाग क्रमांक – १२०

राजराजेश्वरी रेडकर (शिंदेसेना) vs विश्वास शिंदे (UBT) विजयी

प्रभाग क्रमांक – २०६

संजय (नाना) आंबोले (शिंदेसेना) vs सचिन पडवळ (UBT) विजयी (मतमोजणी वेळी निवडणूक अधिकाऱ्यासोबत संगनमत केल्याचा आरोप)

प्रभाग क्रमांक – २०३

समिधा भोळेकर (शिंदेसेना) vs भारती पेडणेकर (UBT) विजयी (मतमोजणी वेळी निवडणूक अधिकाऱ्यासोबत संगनमत केल्याचा आरोप)

प्रभाग क्रमांक – ७७

प्रियांका आंबोलकर (शिंदेसेना) vs शिवानी परब (UBT) विजयी

प्रभाग क्रमांक – ८९

राजेश नाईक (शिंदेसेना) vs गीतेश राऊत (UBT) विजयी

प्रभाग क्रमांक – २०८

विजय लिपारे (शिंदेसेना) vs रमाकांत रहाटे (UBT) विजयी (संपत्ती लपवली असा आरोप)

प्रभाग क्रमांक – १९८

वंदना गवळी (शिंदेसेना) vs अबोली खाड्ये (UBT) विजयी (शिक्षण तसंच गुन्हे लपवल्याचा आरोप)

प्रभाग क्रमांक – ४१

मानसी पाटील (शिंदेसेना) vs सुहास वाडकर (UBT) विजयी

प्रभाग क्रमांक – ९४

पल्लवी पै (शिंदेसेना) vs प्रज्ञा भुतकर (UBT) विजयी

प्रभाग क्रमांक ५३

अशोक खंडवे (शिंदेसेना) vs जितेंद्र वाळवी (शिवसेना UBT) विजयी

प्रभाग क्रमांक – १८७

शेख वकील सागीर अहमद (शिंदेसेना) vs जोसेफ कोळी (UBT) विजयी



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: गोर करणाऱ्या क्रीममध्ये भेसळ पण FDA कारवाई करु शकत नाही, तुकाराम मुंढेसमोर मोठं चॅलेंज
  • वयाच्या 12 व्या वर्षी लिहिली गाणी, 45 व्या वयापर्यंत 17 मुलींसोबत केलं लग्न, कोण आहे हा गायक?
  • देशवासियांना पॉर्न दाखवून रशियाविरोधात युद्ध लढणार; जेलेन्स्की यांची नवीन ट्रिक; जगही बुचकाळ्यात
  • Bigg Boss 20: अंतर्वस्त्रही धुवायला सांगितलं नाही, नशीब; ‘बिग बॉस 20’मध्ये पहिल्याच दिवशी हायव्होल्टेज ड्रामा, माही विजच्या बॉसगिरीवर वैतागले स्पर्धक
  • Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in