• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गोविंदाची नासाडी… अनवाणी मंदिर आणि दर्ग्यांमध्ये जायची महिला, अनेक वर्षांनंतर मोठं रहस्य समोर

September 7, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता गोविंदा हिने कॅमेडी, ॲक्शन आणि ड्रामा अशा वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे करत 90 च्या दशकात बॉलिवूड गाजवला आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता अभिनेत्याच्या करियरबद्दल सनिर्माते आणि लेखक महमूद अली यांनी थक्क करणारा दावा केला आहे. एका पॉडकास्टमध्ये महमूद अली यांनी गोविंदा याला फार जवळचा असल्याचं सांगत, जुन्या वादाबद्दल मोठा खुलासा केला आहे. महमूद अली यांनी सांगितल्यानुसार, एक महिला सतत मंदिर, दर्गा आणि चर्चमध्ये जायची आणि एकच प्रार्थना करायची की, गोविंदा पूर्णपणे उद्ध्वस्तच झाला पाहिजे… धक्कादायक सत्य म्हणजे, या गोष्टीचा स्वीकार खुद्द गोविंदाने देखील केला.

सेटवरुन सुरु झालेला मोठा वाद…

महमूद अली यांच्यानुसार, 1998 मध्ये गोविंदा याने दिग्दर्शक आणि निर्माते हर्मेश मल्होत्रा यांच्या ‘दुल्हे राजा’ सिनेमात काम केलं आणि सिनेमा हिट ठरला. त्यानंतर ‘अंखियों से गोली मारे’ आणि ‘खुल्लम खुल्ला प्यार करें’ सिनेमा साईल केला. दावा असा करण्यात आला आहे की, ‘खुल्लम खुल्ला प्यार करें’ सिनेमाच्या शुटिंगसाठी शिमला येथे मोठा सेट तयार करण्यात आलेला. पण गोविंदा शुटिंगसाठी पोहोचलाच नाही. त्याने मुंबई सेट उभारण्यास सांगितलं… तेव्हा शिवला येथे उभारलेले सेट मुंबई उभारला. ट्रकने सामान मुंबईत आणत असताना पूर आला आणि सर्व सामान खराब झालं. त्यानंतर मुंबईत नव्याने सेट उभारण्यात आला. पण गोविंदा तेथे देखील शुटिंगसाठी आला नाही आणि तारख बदलत गेल्या…

7 वर्ष केली गोविंदाची प्रतिक्षा…

महमूद अली यांनी सांगितल्यानुसार, हर्मेश मल्होत्रा यांच्या जवळच्या सुत्रांचा दावा होता की, जवळपास 7 वर्ष गोविंदाची प्रतिक्षा केली. ‘दुल्हे राजा’ सिनेमा 1998 मध्ये प्रदर्शित झाला आणि ‘खुल्लम खुल्ला प्यार करें’ सिनेमा एप्रिल 2005 मध्ये प्रदर्शित झाला. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला आणि त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात हर्मेश मल्होत्रा यांनी शेवटचा श्वास घेतला. रिपोर्टमध्ये त्यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळे झालं असं सांगण्यात आलं.

गोविंदाचं वाईट झालं पाहिजे… अशी प्रार्थना कोण करायचं?

महमूद अली यांनी सांगितल्यानुसार, हर्मेश मल्होत्रा यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी रोजा जुहू पासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पायी जायती. त्यानंतर मखदूम बाबा यांच्या दर्ग्यात आणि चर्चमध्ये देखील जायची. येथे जाऊन त्या फक्त एक प्रार्थना करायच्या की, गोविंदा उद्ध्वस्त झाला पाहिजे… महमूद अली यांनी असाही दावा केला की, जेव्हा गोविंदाने स्वतः सिमेमाची निर्मिती केली तेव्हा त्याला याची जाणीव झाली आणि अभिनेत्याने संपूर्ण प्रकरणाचा स्वीकार केला.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 40 चोरांमध्ये जीनत अमानचा डान्स, पाहून सर्वांनीच धरला होता ठेका, 46 वर्षांपासून गाणं सुपरहिट
  • Bigg Boss 20 : एकेकाळी हॉटेलमध्ये वेटर, सैफ-करीनाच्या लग्नात घासली भांडी; आज ‘या’ अभिनेत्याची सलमानच्या शोमध्ये एन्ट्री
  • Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट…
  • Feng Shui : या चार वस्तू घरात ठेवा; होईल धनाचा वर्षाव, नशीबच बदलून जाईल
  • Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in