• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Flipkart वर Huawei चे प्रभावी टॅब्लेट्स विक्रीसाठी उपलब्ध, जाणून घ्या किंमत आणि प्रभावी फिचर्स

August 13, 2026 by admin Leave a Comment


हुआवेने त्यांचे दोन टॅब्लेट, मेटपॅड एसई 11 आणि मेटपॅड 11.5 पेपरमॅट एडिशन फ्लिपकार्टच्या माध्यमातून भारतात उपलब्ध केले आहेत. हे दोन्ही टॅब्लेट अभ्यास, ऑफिसचे काम आणि दैनंदिन वापरासाठी डिझाइन केलेले आहेत. त्यांमध्ये मोठी स्क्रीन, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि काम सोपे करणारी अनेक फिचर्स आहेत. चला तर मग या टॅब्लेट्सची किंमत जाणून घेऊयात.

Huawei MatePad SE 11 आणि MatePad 11.5 किंमत

भारतात Huawei MatePad SE 11 ची किंमत 25 हजार 999 रूपये आहे . MatePad 11.5 PaperMatte Edition ची किंमत 45 हजार 999 रूपये असून, त्यासोबत कीबोर्ड मिळतो. हे दोन्ही टॅब्लेट भारतात केवळ फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

हुवावे MatePad 11.5 पेपरमॅट एडिशनचे फिचर्स

मेटपॅड 11.5 पेपरमॅट एडिशनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 11.5-इंचाचा 2.5K फुलव्ह्यू पेपरमॅट डिस्प्ले आहे. हुआवेच्या मते, यात एक विशेष स्क्रीन टेक्नॉलॉजी आहे जे ब्राईटनेस आणि डोळ्यांवरील ताण कमी करण्यास मदत करते. कॅमेऱ्याच्या बाबतीत, या टॅबलेटमध्ये 13MP चा मागील कॅमेरा आणि 8MP चा पुढील कॅमेरा आहे. तसेच, यात 1080p व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा देखील आहे.

यात अद्ययावत Huawei Notes ॲप आहे. ज्याच्या मदतीने युजर्स डॉक्युमेंट्स नोट्स लिहू शकता. त्यासोबतच काम अधिक चांगल्या प्रकारे मॅनेज करण्यास देखील मदत होते. कार्यक्षमतेसाठी यात Kirin T82B चिपसेट आहे, ज्याचा क्लॉक स्पीड 2.4GHz पर्यंत आहे. यात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. या टॅबलेटमध्ये 10,100mAh क्षमतेची मोठी बॅटरी असून, ती 40W Huawei SuperCharge फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Huawei MatePad SE 11 मध्ये काय खास आहे?

मेटपॅड SE 11 मध्ये 1,900×1,200 पिक्सेल रिझोल्यूशन असलेली 11-इंचाची फुल-एचडी+ स्क्रीन आहे. याची ब्राइटनेस 400 निट्सपर्यंत पोहोचते.

ही स्क्रीन लो ब्लू लाइट आणि फ्लिकर-फ्रीसाठी TÜV Rheinland द्वारे प्रमाणित आहे.

यामध्ये किरिन 710A चिपसेट, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे.

हा टॅबलेट Huawei M-Pen Lite ला देखील सपोर्ट करतो, ज्यामुळे तो विद्यार्थी आणि व्यावसायिक दोघांसाठीही नोट्स घेण्यासाठी उपयुक्त ठरतो.

ऑडिओसाठी यात Huawei Histen 9.0 तंत्रज्ञानासह चार स्पीकर्स आहेत.

कॅमेऱ्यामध्ये 8MP चा मागील सेन्सर आणि 5MP चा पुढील सेन्सर समाविष्ट आहे.

कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Wi-Fi आणि Bluetooth 5.1 यांचा समावेश आहे. MatePad SE 11 चे वजन अंदाजे 475 ग्रॅम असून त्याची जाडी 6.9mm आहे. यात 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,700mAh क्षमतेची बॅटरी आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in