• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

feng Shui : आर्थिक समस्या सोडवण्यासाठी ‘हे’ 4 प्रभावी उपाय, घरात नांदेल समृद्धी

July 26, 2026 by admin Leave a Comment


feng Shui : हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला फार मोठं महत्त्व आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना वास्तूनुसार आपण अनेक गोष्टी ठरवत असतो. अशात सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर, ज्योतिष आणि वास्तुशास्त्राप्रमाणेच, ‘फेंग शुई’ची तत्त्वे देखील घरातील सकारात्मक ऊर्जा वाढविण्यात मदत करतात. अनेक लोक, कितीही कष्ट करून कमावलं तरी,कर्ज किंवा सततच्या आर्थिक अडचणींसारख्या खर्चांमुळे त्रस्त असतात. तर फेंग शुईच्या अशा 4 महत्त्वाच्या टिप्स आहेत, ज्या तुम्हाला अशा समस्यांवर मात करण्यास आणि तुमच्या घरात समृद्धी आणण्यास मदत करतील.

हसणाऱ्या बुद्धाची मूर्ती: फेंग शुईनुसार, घरात हसणाऱ्या बुद्धाची मूर्ती ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. अनेकांच्या घरात मुर्ती असते देखील यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि संपत्ती व आनंदात वाढ होते. आर्थिक अडचणी आणि कर्जाच्या समस्या हळूहळू कमी होतात आणि घरात आर्थिक स्थैर्य प्राप्त होते.

फेंग शुई धातू/स्फटिक कासव: ज्यांना सतत पैशांचे नुकसान किंवा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी फेंग शुई कासव हा सर्वोत्तम उपाय आहे. हे कासव पाण्याने भरलेल्या एका लहान काचेच्या भांड्यात ठेवून घराच्या उत्तर दिशेला ठेवावे. यामुळे घरात आर्थिक प्रगती, शांती, आनंद आणि समृद्धी आकर्षित होते… असं देखील म्हणतात.

पवन घंटी: म्हणजेच ‘विंड चाइम’ (Wind Chime) घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि घरात शुभशकुन आणण्यासाठी विंड चाईम्स खूप उपयुक्त आहेत. वाऱ्याने हलवल्यावर या चाईम्सचा आवाज संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरवतो. ते दुष्ट शक्तींना दूर ठेवतात आणि नशीब, पैसा व आनंद वाढवतात.

चिनी नाणी: लाल धाग्याने किंवा रिबनने बांधलेली चिनी नाणी घरात ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. ती मुख्य दरवाजाच्या आत किंवा लॉकरमध्ये ठेवल्याने पैशाचा ओघ वाढतो. यामुळे कर्जातून लवकर मुक्ती मिळण्यास आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग… सुषमा अंधारे संतापल्या
  • अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
  • Khawdya Dongar tragedy : खवड्या डोंगर प्रकरणात मोठी अपडेट… अखेर मावस बहिणीने सर्वच सांगितलं, थेट म्हणाली..
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, थेट अपर सचिवांना अटक; धक्कादायक खुलासे होणार?
  • Nepal Flood: नेपाळमध्ये पूराचा हाहाकार, गावची गावं वाहून गेली, पत्त्यांप्रमाणे कोसळल्या इमारती, धडकी भरवणारे व्हिडीओ समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in