
जगातील सर्वात मोठी कॅब उबेर कंपनीने नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जवळपास 3300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीतील एकूण 10 टक्के कर्मचार्यांना काढून टाकलं आहे. 2020 साल म्हणजे कोरोना काळानंतर कंपनीने केलेली सर्वात मोठी नोकर कपात केल्याचे बोलले जात आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टुनुसार, उबरमध्ये पुनर्रचना केल्यानंतर मॅनेजरची संख्या 20 टक्क्यांनी कमी केली आहे. कंपनीने एकूण किती मॅनेजरला कामावरून काढलं, हे स्पष्ट केलेलं नाही. मॅनेजरसहित इतर पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढून टाकलं आहे. उबरने गेल्या वर्षी जगभरातील 34000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. उबेर कंपनीला व्यवस्थापन करताना अनेक आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे कंपनीने नोकर कपातीचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या Waymo सारख्या चालक नसलेल्या वाहतूक सेवेमुळे गुंतवणूकदारांचा कल दुसरीकडे वळू लागला आहे. त्याचा परिणाम उबेरवर दिसत आहे. त्याचबरोबर उबेर कंपनीच्या शेअरवर देखील दिसत आहे. यामुळे उबेर कंपनी खर्च कमी करण्याचा विचार करताना दिसत आहे.
उबरचे सीईओ दारा यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटलं आहे की, गेल्या काही वर्षांत कंपनीचा जलद विस्तार झाला, त्यामुळे कंपनीत अनेक विभाग निर्माण झाले आहेत. परंतु यामुळे कंपनीच्या कामाची प्रक्रिया संथ झाली आहे. त्यामुळे कर्मचारी कमी करून उर्वरित विभागांमध्ये ताळमेळ बसवायचा आहे. आता एक किंवा दोन जणांच्या कर्मचाऱ्यांचा गट करून कंपनी काम करणार आहे. आता कंपनी इंजिनीअरिंग, सायन्स आणि डिलिव्हरीसारख्या विभागाची प्रक्रिया सरळ आणि सोपी करणार आहे. यासहित रेस्टॉरंट, रिटेल आणि व्हाइट लेबल डिलिव्हरी या विभागाशी संबंधित तीन ऑपरेशनल टीमचे विलीनीकरण करण्याची कंपनीची योजना आखली आहे. सीईओ पुढे म्हणाले, ‘पुनर्रचना केल्यानंतर होणारी बचत ही कंपनी विकास, नवीन तंत्रज्ञानावर पुन्हा गुंतवणार आहे. यासहित उबेर जगभरातील चालक, डिलिव्हरी कुरीअर्स आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक पैसा गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. त्याचसोबत भविष्यात चालक नसलेल्या कॅब सेवा तयार करण्याचाही विचार करत आहे’.
Leave a Reply