
Elon Musk यांनी ट्वीटर विकत घेतल्यानंतर त्याचे नाव बदलून एक्स केले होते. मात्र, आता त्यांची चूक त्यांना महागात पडणार आहे. कारण सोशल मीडियाच्या दुनियेत Twitter नावाची पुन्हा एण्ट्री झाली आहे. या नव्या प्लॅटफॉर्मचे नाव Twitter.now आहे. नवीन प्लॅटफॉर्म बनवणाऱ्या कंपनीच्या मते मस्क यांच्या X प्लॅटफॉर्मने ट्विटर नावाचा वापर करणे सोडले होते. त्यामुळे आम्ही या नावाचा वापर करत आहोत. विशेष म्हणजे हा प्लॅटफॉर्म ज्यांनी तयार केला आहे ते जुन्या ट्वीटर टीममधीलच सदस्य आहेत.
सोशल मीडिया की दुनिया में Twitter नाम की एक बार फिर वापसी हो गई है. Elon Musk ने Twitter का नाम बदलकर X कर दिया था, लेकिन अब एक नए प्लेटफॉर्म ने ट्विटर नाम से अपनी शुरुआत की है. नए प्लेटफॉर्म को बनाने वाली कंपनी का कहना है कि मस्क के X प्लेटफॉर्म ने ट्विटर नाम का इस्तेमाल करना छोड़ दिया है. इसी वजह से अब इस नाम का इस्तेमाल किया जा रहा है. आइए जानते हैं इस नए प्लेटफॉर्म के बारे में.
नव्या Twitter चा काय हेतू..
नव्या प्लॅटफॉर्मचे नाव Twitter.now आहे. याला Operation Bluebird नावाच्या कंपनीने लाँच केला आहे. खास बाब म्हणजे या कंपनीत ट्वीटरचे काही जुने कर्मचारी सामील आहेत. या कंपनीचा हेतू जुन्या ट्विटर सारखा एक्सपिरियन्स पुन्हा आणणे आहे.
Elon Musk यांनी साल 2022 मध्ये ट्विटरला खरेदी केले होते. यानंतर साल 2023 मध्ये ट्विटरचे नाव बदलून X करण्यात आले होते. त्यानंतर ट्विटरने आपला निळ्या रंगाच्या पक्षाचा लोगो देखील हटवला होता. ट्विटरने एक्स असे नाव धारण केले तरी लोकांच्या तोंडात आणि लिहिताना ट्वीटर आणि ट्वीट हे शब्द आजही कायम आहेत. त्यामुळे आता ट्वीटर जर पुन्हा येत असेल तर इलॉन मस्क यांना मोठा धोका असल्याचे म्हटले जात आहे.
नावा संदर्भात कायदेशीर लढाई
आता ट्विटर संदर्भात एक्स आणि Operation Bluebird दरम्यान कायदेशीर लढाई चालू आहे.एक्सचे म्हणणे आहे की ट्विटर आणि ट्वीट नावावर त्याचा अजूनही अधिकार आहे.तर नव्या प्लॅटफॉर्मच्या वतीने दावा केला जात आहे की एक्सने या नावाचा वापर करणे सोडले आहे.
कोणते असणार फिचर्स ?
नव्या Twitter मध्ये पोस्ट, रिप्लाय आणि रिट्वीट सारखे जुने फिचर्स पाहायला मिळणार आहे.यात एआयच्या मदतीने फॅक्ट चेक करण्याचे फिचर्स देखील देण्यात आले आहे. आता नवीन प्लॅटफॉर्म लोकांना किती आवडेल आणि तो मस्क यांच्या एक्सला टक्कर देणार का ? याकडे आता लक्ष लागले आहे.
कोठून डाऊनलोड कराल ?
जर तुम्हाला या नवीन एप्सला डाऊनलोड करु इच्छीत असाल तर आता असे करणे शक्य नाही. सध्या Twitter.nowने त्यांचे app प्ले स्टोर वा एप्स स्टोरवर लाँच केलेले नाही.
मात्र, वेबसाईटवर याची माहिती दिलेली आहे. वेबसाईटवर लिहिले आहे की हा प्लॅटफॉर्म एक्सशी संबंधित नाही. या सोबत युजर्सना अर्ली एक्सेस देखील दिला जात आहे. यासाठी युजर्सना फॉर्म भरुन साईन अप करावे लागणार आहे. यानंतरच हे एप्स वापरण्याची संधी मिळणार आहे.
Leave a Reply