• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ED Raids: मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या मंत्र्यांच्या जावयाच्या घरावर ईडीचे छापे, मोठी खळबळ, सापडले घबाड?

June 24, 2026 by admin Leave a Comment


ED raids on Additional Excise Commissioner Y Manjunath: कर्नाटकच्या राजकारणात एक नाट्यमय वळण आले आहे. मंत्री सतीश जारकीहोळी हे काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जात होते. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांचे जावाई आणि बेळगावचे अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त वाय मंजुनाथ यांच्या घरावर ईडीचा छाप पडला आहे. त्यांच्या इतर ठिकाणीही सक्तवसुली संचालनालयाने छापे टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या छाप्यात ईडीच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे सापडल्याचा दावा करण्यात येत आहे.

ईडीच्या छाप्याने बेळगावमध्ये एकच खळबळ

कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांचे जावई आणि बेळगावचे अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त वाय मंजुनाथ यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. बेळगाव, म्हैसूर, बंगळूर आणि आरसिकेरे यासह सहा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले आणि अनेक ठिकाणी वाय मंजुनाथ यांच्याशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंजुनाथ यांच्या म्हैसूरमधील एका मित्राच्या घरावर, बंगळूरमधील एका अपार्टमेंटवर, हसन जिल्ह्यातील आरसिकेरे येथील एका जवळच्या मित्राच्या घरावर आणि अथणी तालुक्यातील ऐनापूर गावातील एका मित्राच्या घरावरही छापे टाकले आहेत. या ठिकाणी काही कागदपत्रे केंद्रीय तपास यंत्रणेच्या हाती लागल्याचे समजते. अजून याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती यंत्रणेने दिलेली नाही. या कारवाईनंतर वाय मंजूनाथ यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

अवैध मालमत्तेचा ठपका

बेल्लारीचे माजी खासदार देवेंद्रप्पा यांचे पुत्र वाय मंजुनाथ यांच्यावर बेनामीच्या नावाखाली जमीन, बार आणि रेस्टॉरंटच्या माध्यमातून अवैध मालमत्ता मिळवल्याचा आरोप आहे. वाय मंजुनाथ यांच्या सध्या बंगळूरमधील एका अपार्टमेंटमधील निवासस्थानीही कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. या छापे सत्रामुळे कर्नाटकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मंत्री सतीश जारकीहोळी हे कर्नाटकमधील हेवीवेट मंत्री मानले जातात. काही दिवसांपूर्वी त्यांचे नावही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. बेळगाव आणि उत्तर भागात त्यांचा चांगला दबदबा असल्याचे मानले जाते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 15 लाख घरांची मोठी घोषणा! जयकुमार गोरेंचं विधानसभेत मोठं आश्वासन, म्हणाले…
  • Ketan Agarwal Murder Case : पळून जाऊन सियाशी लग्न का केलं नाही? केतनला मारलंच का? चेतनचं उत्तर ऐकून सर्वच हादरले…
  • घरात नकारात्मकतेचं वातावरण! वास्तुदोष दूर करण्यासाठी लिंबाचा उत्तम उपाय
  • ‘देऊळ बंद 2’ने ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडू नये; प्रवीण तरडेंची इच्छा, रितेश देशमुखबद्दल म्हणाले..
  • Ketan Murder Case: केतनच्या हत्येसाठी राजा रघुवंशी पॅटर्न; सोनम रघुवंशीप्रमाणेच सियाकडून खूनाची प्लॅनिंग… मर्डर पॅटर्नने हादरले पोलीस

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in