• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ebola Outbreak : भयानक महामारीचं संकट धडकलं, WHO चा जगाला गंभीर इशारा, या देशात हाहाकार!

August 2, 2026 by admin Leave a Comment


Congo Ebola : कोरोना महासाथीमुळे कधीकाळी संपूर्ण जग्ग ठप्प पडले होते. या महासाथीने जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला. या जीवाणाची संसर्घ एवढा भीषण होता की लोक घरात बसून होते. रस्ते ओस पडले होते. दरम्यान, आता कोरोनाची भीती संपली आहे. परंतु कोरोना महासाथ संपलेली असली तरीही दिवसेंदिवस आरोग्यविषयक आव्हान आणखी गडत होत चालले आहे. कांगो या देशात आता इबोलाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असून ही बाब जगासाठी चिंताजनक ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO नेदेखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

महामारीत 1500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये अर्थात कांगो येथे इबोलाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. तेथे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याबाबत इशारा देत, योग्य वेळी नियंत्रण न मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. WHO च्या माहितीनुसार, यंदाच्या उद्रेकात 3600 हून अधिक संशयित तसेच संक्रमण झालेल्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या महामारीत 1500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. या साथीचा मृत्यूदर सुमारे 44 टक्के असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे संसर्गाची साखळी अद्याप अजूनही चालूच असल्याने नवीन रुग्ण सातत्याने समोर येत आहेत.

संसर्ग नेमका का पसरतोय?

कांगोच्या ईशान्येकडील इतुरी प्रांत सर्वाधिक प्रभावित झाला आहे. हा भाग दक्षिण सुदान आणि युगांडाच्या सीमेजवळ आहे. या भागात लोकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. विस्थापन, अपुरी आरोग्य सुविधा आणि स्वच्छ पाणी व अन्नाचा अभाव यामुळे संसर्ग अधिक वेगाने पसरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यंदाचा इबोला उद्रेक हा कांगोच्या इतिहासातील सर्वात मोठ्या इबोला साथींपैकी एक ठरला आहे. 2018 ते 2020 या कालावधीत झालेल्या भीषण उद्रेकातील रुग्णसंख्येलाही यावेळच्या साथीने मागे टाकले आहे. त्यामुळे ही महामारी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी इबोला साथ ठरल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीच्या काही महिन्यांतच या साथीमुळे मागील अनेक उद्रेकांच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक मृत्यू झाले आहेत. त्यामुळे लसीकरण आणि प्रभावी नियंत्रण उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे, असे मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!
  • Manoj Jarange Patil : तुम्ही 58 लाख नोंदी दिल्या, आम्ही म्हणतो प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे यांची शिष्टमंडळासमोर अट
  • माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in