• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

E20 : इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत वस्तुस्थिती समोर, जाणून घ्या गैरसमज आणि सत्य

July 30, 2026 by admin Leave a Comment


अलीकडे इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमाबाबत काही दिशाभूल करणारे दावे माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. वैज्ञानिक चाचण्या, दीर्घकालीन प्रत्यक्ष वापराचा अनुभव आणि उद्योग क्षेत्रातील आकडेवारीच्या आधारे या दाव्यांबाबत सरकारने पुढील स्पष्टीकरण दिले आहे.

दावा 1: 2023 पूर्वी तयार झालेल्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरता येत नाही

उत्तर – E15 पेक्षा जास्त इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर भारतात साडेतीन वर्षांहून अधिक काळ सुरू आहे, तर E19-E20 इंधनाचा वापर अडीच वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. या काळात इथेनॉलमुळे मोठ्या प्रमाणावर इंजिन निकामी होणे किंवा वाहने बंद पडल्याचे कोणतेही अधिकृत किंवा सत्यापित पुरावे समोर आलेले नाहीत.

जर इथेनॉलमुळे इंजिन किंवा इंधन प्रणालीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते, तर मोठ्या प्रमाणात वॉरंटी क्लेम, सर्व्हिस मोहिमा आणि ग्राहकांच्या तक्रारी दिसून आल्या असत्या. मात्र, असे काहीही घडलेले नाही. इथेनॉल हे नवीन इंधन नाही. जगभरात शंभर वर्षांहून अधिक काळ त्याचा वापर होत आहे. ब्राझीलसारख्या देशांमध्ये अनेक दशकांपासून अधिक प्रमाणात इथेनॉल मिश्रित इंधन वापरले जाते.

भारतात इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाची सुरुवात 2001 मध्ये पायलट प्रकल्पातून झाली. 2006 मध्ये E5 सुरू करण्यात आले. 2013-14 मध्ये इथेनॉल मिश्रण फक्त 1.53% होते, जे आवश्यक पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षमता विकसित केल्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आले.

भारतात इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आला आहे. 2013-14 या वर्षात पेट्रोलमधील सरासरी इथेनॉल मिश्रण केवळ 1.53 टक्के होते. त्यानंतर आवश्यक उत्पादन क्षमता, पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक तयारी केल्यानंतर हे प्रमाण सातत्याने वाढवण्यात आले. 2020-21 मध्ये ते 8.1 टक्क्यांपर्यंत, 2021-22 मध्ये 10 टक्के, 2022-23 मध्ये 12 टक्के, 2023-24 मध्ये 14.6 टक्के आणि 2024-25 मध्ये 19.2 टक्के इतके झाले. त्यानंतर नोव्हेंबर 2025 ते जून 2026 या कालावधीत देशात इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे भारतात इथेनॉल मिश्रणाची अंमलबजावणी एकाच वेळी न करता नियोजनबद्ध आणि टप्प्याटप्प्याने करण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

प्रत्यक्ष अनुभव काय सांगतो?

भारतात दररोज सुमारे 8 कोटी वाहने पेट्रोल पंपांवर इंधन भरतात. एका प्रमुख वाहन उत्पादक कंपनीने 2025-26 या आर्थिक वर्षात 2.84 कोटी वाहनांची सर्व्हिसिंग केली. यामध्ये 1.5 कोटी जुनी, मूळतः E20 प्रमाणित नसलेली वाहने होती. तपासणीत E20 मुळे गंज, असामान्य झीज, पार्ट्सचे आयुष्य कमी होणे यापैकी कोणतीही समस्या आढळली नाही. एका प्रमुख दुचाकी उत्पादक कंपनीनेही याच प्रकारचा अनुभव नोंदवला आहे.

E20 लागू करण्यापूर्वी SIAM, ARAI, वाहन उत्पादक, सुटे भाग उत्पादक, चाचणी संस्था आणि ऑइल मार्केटिंग कंपन्यांशी विस्तृत चर्चा करण्यात आली होती. इंधन प्रणाली, इंजिन कॅलिब्रेशन, कार्यक्षमता, टिकाऊपणा, उत्सर्जन आणि वाहनांची कामगिरी यांची वैज्ञानिक चाचणी घेण्यात आली. वाहन उत्पादक आजही E20 वापरणाऱ्या वाहनांची वॉरंटी देत आहेत.

एका वाहन उत्पादकाने 1.4 कोटी E20 वापरणाऱ्या वाहनांचा डेटा तपासून इथेनॉलमुळे गंज झाल्याचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे सांगितले. ARAI नेही E20 वाहनांवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चाचण्या केल्या जात असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय ऑइल मार्केटिंग कंपन्या 30,000 हून अधिक पेट्रोल पंपांवर नियमित गुणवत्ता तपासणी करतात. इथेनॉल मिश्रित पेट्रोल BIS मानकांनुसार तयार केले जाते. सरकारच्या मते “मोठ्या प्रमाणावर कोणतीही समस्या आढळलेली नाही” हा निष्कर्ष 25 वर्षांच्या अनुभवावर, वैज्ञानिक चाचण्यांवर, कोट्यवधी वाहनांच्या वापरावर, वाहन उत्पादकांच्या डेटावर आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता तपासणीवर आधारित आहे.

दावा 2 : जवळपास 30 कोटी वाहने निरुपयोगी ठरतील.

उत्तर – E15+ इंधनाचा वापर साडेतीन वर्षांपासून सुरू आहे. E19-E20 इंधनाचा वापर अडीच वर्षांपासून सुरू आहे. या काळात 20 कोटींहून अधिक दुचाकी, 3 कोटींहून अधिक पेट्रोल कार यांनी E20 इंधनावर यशस्वीपणे प्रवास केला आहे. जर E20 मुळे वाहने निकामी होत असती तर देशभरात लाखो वाहने बंद पडली असती, लाखो वॉरंटी क्लेम आले असते आणि मोठ्या प्रमाणावर सर्व्हिस मोहिमा राबवाव्या लागल्या असत्या. प्रत्यक्षात असे काहीही घडलेले नाही.

दावा 3: वाहन उत्पादक खासगीत सांगतात की E20 योग्य नाही.

उत्तर – 4 जुलै 2026 रोजी पेट्रोलियम मंत्रालय, अवजड उद्योग मंत्रालय आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये Toyota Kirloskar, Maruti Suzuki, Hero MotoCorp, Hyundai Motor India, TVS Motor Company, Bajaj Auto या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी स्पष्ट केले की, E20 लागू करण्यापूर्वी कठोर चाचण्या घेण्यात आल्या. इथेनॉल हे स्वच्छ आणि कार्यक्षम इंधन आहे. UNECE या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार चाचण्या करण्यात आल्या.

Maruti Suzuki ने सांगितले की 2.84 कोटी वाहनांचा डेटा तपासण्यात आला, 1.5 कोटी जुनी वाहनेही यात होती. E20 मुळे गंज, झीज किंवा पार्ट्सचे आयुष्य कमी झाल्याचे आढळले नाही. मायलेजमध्ये साधारण 3 ते 3.5% इतकाच फरक पडतो. टायर प्रेशर, ड्रायव्हिंगची पद्धत, देखभाल आणि वाहतूक कोंडी यांचा मायलेजवर अधिक परिणाम होतो. Hero MotoCorp नेही E20 मुळे वाहनांच्या नुकसानीत वाढ झाल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचे सांगितले. Hyundai, TVS आणि Bajaj यांनीही E20 कार्यक्रमावर विश्वास व्यक्त केला.

दावा 4: जुनी वाहने धोक्यात आहेत.

उत्तर – एका मोठ्या वाहन उत्पादकाने 2.84 कोटी वाहनांची तपासणी केली. त्यातील 1.5 कोटी वाहने E20 प्रमाणित नव्हती. तरीही गंज नाही, अतिरिक्त झीज नाही, पार्ट्सचे आयुष्य कमी झाले नाही. दुसऱ्या एका कंपनीने 1.4 कोटी E20 वाहनांचा अभ्यास करूनही इथेनॉलमुळे गंज झाल्याचे आढळले नाही.

दावा 5: मायलेज मोठ्या प्रमाणात कमी होते.

उत्तर – सरकार आणि वाहन उत्पादकांच्या अभ्यासानुसार मायलेज अनेक गोष्टींवर अवलंबून असते. वाहन चालवण्याची पद्धत, वाहतूक कोंडी, वाहनाची देखभाल, टायरमधील हवा, एसीचा वापर जुन्या E10 वाहनांमध्ये मायलेजमध्ये साधारण 3 ते 5 टक्के इतकीच घट दिसू शकते. याउलट E20 मुळे उच्च ऑक्टेन रेटिंग, नॉकिंग कमी, स्वच्छ ज्वलन, इंजिन अधिक सुरळीत चालते, वाहनाची कार्यक्षमता आणि ॲक्सिलरेशन सुधारते.

दावा 6: वाहन उत्पादकांना E20 चे समर्थन करण्यासाठी दबाव टाकला जात आहे.

उत्तर – जर वाहन उत्पादक समाधानी नसते तर त्यांनी E20 प्रमाणित वाहने बाजारात आणली नसती. E20 वापरणाऱ्या वाहनांवर वॉरंटीही दिली नसती. आजही कंपन्या E20 वापरणाऱ्या वाहनांची वॉरंटी देत आहेत, कारण त्यांना चाचण्यांवर पूर्ण विश्वास आहे.

दावा 7: सरकारच्या दबावाखाली वाहन कंपन्या सत्य लपवत आहेत.

उत्तर – भारतातील वाहन उत्पादक स्वतंत्र सूचीबद्ध कंपन्या आहेत. त्यांच्यावर ग्राहकांसमोरील कायदेशीर जबाबदाऱ्या, नियामक नियम, वॉरंटी दावे, उत्पादन जबाबदारी, ब्रँड प्रतिमा यांचा मोठा प्रभाव असतो. जर E20 मुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते तर कंपन्यांना ते लपवणे शक्यच झाले नसते.

4 जुलै 2026 च्या पत्रकार परिषदेत Toyota, Maruti, Hero, Hyundai, TVS आणि Bajaj यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सार्वजनिकरित्या E20 कार्यक्रमाला पाठिंबा दर्शवला. त्यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार Maruti Suzuki च्या 2.84 कोटी वाहनांच्या डेटामध्ये E20 मुळे कोणतेही नुकसान आढळले नाही. Hero MotoCorp कडे E20 वापरणाऱ्या दुचाकींमध्ये नुकसान वाढल्याचा कोणताही पुरावा नाही. Toyota Kirloskar ने सांगितले की आंतरराष्ट्रीय UNECE मानकांनुसार कठोर चाचण्या पूर्ण केल्यानंतरच E20 लागू करण्यात आले.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रॉयल एनफील्डचा धमाका! आयकॉनिक Continental GT 650 नवीन फीचर्ससह लाँच; जाणून घ्या किंमत
  • पाय बांधले, डोक्यावर वार.. NEET विद्यार्थिनीच्या हत्येने शहर हादरलं; पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ
  • आता इराणला हरवणे अशक्य ? अमेरिकेशी युद्ध सुरु असताना इराणला गवसला मोठा खजाना…
  • मोठा दणका! मुंबईत मंत्र्यांच्या फ्लॅटवर थेट कारवाई, उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर हतोडा?
  • भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांची एंट्री? दिल्ली वाऱ्या वाढल्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in