
अजय देवगणच्या 'दृश्यम 3' या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित या चित्रपटातून अजय पुन्हा एकदा विजय साळगावकर या गाजलेल्या भूमिकेत कमबॅक करत आहे. 'दृश्यम: द कन्क्लुजन' असं या तिसऱ्या भागाचं नाव असून यातील भूमिकेसाठी अजय देवगणने तगडं मानधन घेतल्याचं कळतंय. अजय देवगणला 18 ते 22 कोटी रुपयांचं मानधन मिळाल्याचं समजतंय.
'टाइम्स नाऊ'ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात अभिनेत्री श्रिया सरन पुन्हा एकदा नंदिनी साळगावकरच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासाठी तिने एक ते दीड कोटी रुपये मानधन स्वीकारल्याचं कळतंय. श्रियाने दृश्यमच्या आधीच्या दोन भागांमध्येही उत्तम भूमिका साकारली होती.
दमदार अभिनयकौशल्यासाठी ओळखली जाणारी तब्बू पुन्हा एकदा मीरा देशमुख या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी तिला अडीच ते साडेतीन कोटी रुपयांपर्यंत मानधन मिळालं आहे.
विजय साळगावकरची मोठी मुलगी अंजू साळगावकरची भूमिका अभिनेत्री इशिता दत्ताने साकारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिला 50 लाख ते 80 लाख रुपयांदरम्यान मानधन मिळालं आहे. इशितासुद्धा पहिल्या भागापासून यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
मीरा देशमुखचा पती महेश देशमुखची भूमिका साकारणारा अभिनेता रजत कपूरसुद्धा 'दृश्यम 3'चा महत्त्वपूर्ण भाग आहे. पडद्यावर शांत आणि प्रभावशाली अभिनयासाठी ओळखऱ्या जाणाऱ्या रजतला 40 लाख ते 70 लाख रुपयांदरम्यान मानधन मिळालं आहे.
अभिनेते प्रकाश राज पहिल्यांदाच 'दृश्यम' फ्रँचाइजीमध्ये झळकणार आहेत. यामध्ये ते इंद्रजित शेट्टीची भूमिका साकारणार आहेत. तर अभिनेता जयदीप अहलावत यामध्ये राजवीर सिंह तोमरच्या भूमिकेत आहे. हे दोन्ही कलाकार या भागात नवीन असून त्यांच्या मानधनाविषयीची माहिती अद्याप समोर आली नाही.





Leave a Reply