
दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सेंट्रल झोन आणि ईस्ट झोन आमनेसामने आले आहेत. या सामन्यात ईस्ट झोनने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सेंट्रल झोनने प्रथम फलंदाजी करताना सर्व बाद 266 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी ईस्ट झोनकडून अभिमन्यू ईश्वरन आणि वैभव सूर्यवंशी जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने अक्षरश: कहर केला आणि सेंट्रल झोन संघावर तुटून पडले. अभिमन्यू ईश्वरन आणि वैभव सूर्यवंशीने पहिल्या विकेटसाठी 161 धावांची भागीदारी केली. यात वैभव सूर्यवंशीने गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याने 81 चेंडूत 7 चौकार आणि 7 षटकार मारत 92 धावांची खेळी केली. पण यावेळीही कमनशिबी निघाला. कारण त्याचं शतक अवघ्या 8 धावांनी हुकलं. हर्ष दुबेच्या गोलंदाजीवर त्याला बाद होत तंबूत परतावं लागलं.
वैभव सूर्यवंशी नर्व्हस नाइंटीजवर बाद होण्याची ही काय पहिली वेळ नाही. मागच्या दोन वर्षात 90 ते 99 दरम्यान बाद होण्याची त्याला सवयच लागली आहे. खरं तर दुलीप ट्रॉफी स्पर्धेत त्याला शतक ठोकण्याची संधी होती. पण ही त्याच्याकडून हुकली. त्यामुळे वैभव सूर्यवंशीने 90 धावांचा पल्ला पार केला की बाद होण्याची शक्यता अधिक असते का? खरं तर शतकाच्या बाबतीत जास्त विचार केला की असं होतं, असं मानलं जातं. पण वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत असं नाही. कारण वैभवचा खेळ आक्रमक आहे आणि त्याला शतकाची पर्वा नाही. दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत असंच घडलं आणि शतक हुकलं.
2⃣ in 2⃣
Harsh Dubey finally provides the breakthroughs Central Zone desperately needed
#DuleepTrophy | #CZvEZ
Scorecard
https://t.co/kyExeix2VY pic.twitter.com/XnLgwPgsvD
— BCCI Domestic (@BCCIdomestic) August 31, 2026
वैभव सूर्यवंशी नर्व्हस 90 वर किती वेळा बाद झाला?
- वैभव सूर्यवंशी मागच्या दोन वर्षात सात वेळा नर्व्हस नाइंटीजचा बळी ठरला आहे. त्याने शतकाच्या सात संधी गमावल्या आहेत.
- 4 नोव्हेंबर 2025 या दिवशी बिहारसाठी रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना मेघालयविरुद्ध 93 धावांवर बाद झाला होता. या सामन्यातून त्याने पहिल्यांदा फर्स्ट क्लास अर्धशतक ठोकलं होतं. पण शतक 7 धावांनी हुकलं.
- 10 जानेवारी 2026 रोजी अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या वॉर्म अप सामन्यात स्कॉटलँडविरुद्ध 96 धावांवर बाद झाला होता.
- 19 मे 2026 रोजी आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना शतकापासून वंचित राहिला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 38 चेंडूत 93 धावा केल्या होत्या. पण त्याचं शतक हुकलं.
- 27 मे 2026 रोजी आयपीएल 2026 रोजी एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 97 धावांवर बाद झाला. यावेळी त्याचं शतक फक्त 3 धावांनी हुकलं.
- 29 मे 2026 आयपीएल 2026 क्वॉलिफायर 2 फेरीत गुजरात टायटन्स विरुद्ध त्याचा आक्रमक बाणा पाहायला मिळाला. पण येथेही त्याचं शतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. आयपीएल 2026 स्पर्धेत तीन शतकं हुकली.
- 21 जून 2026 रोजी इंडिया ए कडून खेळताना श्रीलंका ए विरुद्ध ट्राय सीरिज अंतिम फेरीत 94 धावांवर बाद झाला. यावेळी त्याने फक्त 29 चेंडूत ही कामगिरी केली होती.
- 31 ऑगस्ट 2026 रोजी दुलीप ट्रॉफी उपांत्य फेरीत ईस्ट झोनकडून खेळताना 92 धावांवर बाद झाला.

Leave a Reply