
भाजप खासदार धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आंदोलन सुरू होण्याच्या एक दिवसाआधी राजीनामा सादर केला होता. परंतु पक्षाने त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला, असा दावा भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी दावा केला आहे. खरंतर त्यांनी एक नव्हे तर दोन वेळा राजीनामा दिला होता, असा दावा करण्यात आला आहे. त्यांना भाजपच्या नेतृत्वाने राजीनाम्याऐवजी व्यवस्था सुधारण्याचा सल्ला दिला होता, असे सांगण्यात येत आहे.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, विद्यार्थी आंदोलन सुरू होण्याआधी प्रधान यांनी राजीनामा सादर केला होता. परंतु राजीनामा फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी 20 जुलै रोजी वरिष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत राजीनामा दिला होता. त्यावेळी देखील राजीनामा मंजुर केला नव्हता. त्यावेळी देखील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता.
भाजपचं काय म्हणणं होतं?
सरकारी सूत्रांनुसार, मंत्रिपदाचा राजीनामा देणे म्हणजे जबाबदारीपासून पळवाट काढण्यासारखं झालं, असा पक्षाचा विचार होता. सूत्रांच्या माहितीनुसार, राजीनामा देणे सर्वात सोपा उपाय होता. त्याने परिस्थिती हाताळता येते. परंतु त्यावर भाजपचा विश्वास नव्हता. भाजप प्रश्नापासून लांब जाण्याऐवजी सोडवण्यावर भर देतो’.
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा 20 जुलै रोजी फेटाळला. त्याच दिवशी तरुण आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्चमध्ये 12 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. याचदरम्यान कॉक्रोच जतना पार्टी आणि सरकारममध्ये बोलणे देखील झालं. या भेटीत संघटनेने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला. पहिल्या दिवसाच्या चर्चेत दोन मागण्याबाबत सरकार सकारात्मक होतं. परंतु तिसरी मागणी मान्य नव्हती. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने 20 जुलै रोजी सरकारला पुन्हा संसद मार्च काढणार असल्याचा इशारा दिला होता.
दुसरीकडे 20 मार्चच्या आंदोलनामुळे सरकार टेन्शनमध्ये आलं होते. सुरक्षा यंत्रणांनीही अलर्ट दिला होता. काही जण या आंदोलनाचा फायदा उचलत आहे, असा अशी माहिती सरकारला मिळाली होती. या आंदोलनादरम्यान, जवळपास सोशल मीडियावरील 400 अकाउंट पाकिस्तानातून ऑपरेट केले जात होते, असा दावा करण्यात आला. त्यामुळे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत होतं. आंदोलनात विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली होती. कॉक्रोच जनता पार्टीनं पुन्हा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला, त्यावेळी सरकारने राजीनाम्याबाबत विचार केला. त्यावेळी सरकारला कायदा सुव्यवस्था राखायची होती. त्यामुळे जंतर-मंतरवरील आंदोलन थांबवण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला.
Leave a Reply