• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CWG 2026: भारताचा ज्युडोमध्ये डबल गोल्ड धमाका, अस्मिता डे आणि हर्षची सुवर्ण कामगिरी

July 31, 2026 by admin Leave a Comment

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा अंतिम टप्प्यात असताना भारताच्या खात्यात आणखी दोन सुवर्णपदकं आली आहेत. विशेष म्हणजे भारताने प्रथमच ज्युडो क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल मिळवलं आहे. कारण यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे ज्युडो क्रीडाप्रकार आणि पदकाचं महत्त्व वाढलं आहे. भारताच्या अस्मिता डेने 48 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात तिने कॅनडाच्या हेडी क्वाकला पराभवाची धूळ चारली. तिने अंतिम सामन्यात 2-1 ने तिला मात दिली. तर हर्ष सिंहने 60 किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ कॅट्जला पराभूत केलं. या सामन्यात त्याने 10-0 ने विजय मिळवला. भारताला दोन्ही सुवर्ण पदकं 20 मिनिटांच्या अंतराने मिळाली. भारताने कॉमनवेल्थ स्पर्धेत आतापर्यंत 6 गोल्ड जिंकले आहेत. तर 10 रौप्य आणि 14 कांस्य पदक नावावर आहेत. भारताची मेडल संख्या 19 झाली असून दहाव्या क्रमांकावरून आठव्या स्थानी झेप घेतली आहे.

हर्ष सिंहचा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास

 कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत हर्षने फायनल गाठण्यापूर्वी सुरुवातीपासूनच स्पर्धेत आपले निर्विवाद वर्चस्व राखले. राउंड ऑफ 16 मध्ये मलाव्हीच्या चिकोन्डी काथेवेराचा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत वानुआतूच्या अ‍ॅलन मॉनथ्यूलला नमवलं. उपांत्य फेरी ऑस्ट्रेलियाच्याच पेड्रो कार्लोस अँतून नेतो याला नमवून फायनलमध्ये जागा पक्की केली होती. फायनलमध्ये हर्षचा सामना ऑस्ट्रेलियाच्या ऑलिम्पियन ज्युडोपटू जोशुआ काट्झ याच्याशी झाला. सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन खेळाडू जोशुआने आक्रमक पवित्रा घेतला होता. पण संयमी बचाव करून हर्षने त्याला आघाडी घेऊ दिली नाही. सामना संपायला अवघ्या काही सेकंदांचा अवधी शिल्लक असताना हर्षने ‘थ्रो आणि पिन’ डाव टाकला. या डावामुळे त्याला ‘वाझा-अरी’गुण मिळाले. हर्षने हा सामना १०-० अशा फरकाने जिंकून भारताच्या झोळीत सुवर्णपदक टाकले.

अस्मिता डेचा प्रवास

अस्मिता डेने उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंडच्या इव्हा इविंगचा सहज पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत स्कॉटलंडच्याच समर शॉ हिचापराभव करून आपले पदक पक्कं केलं. अंतिम सामन्यात कॅनडाच्या हेडी क्वाकशी लढत झाली. अंतिम सामन्यात अस्मिताची सुरुवात काही खास झाली नाही. कॅनेडियन खेळाडूने सुरुवातीलाच ‘युको’ गुण मिळवला आणि अस्मिताला एक पेनल्टी देखील मिळाल्याने बॅकफूटवर गेली होती. चार मिनिटांच्या या सामन्यात मध्यंतरानंतर अस्मिताने प्रचंड आक्रमक पवित्रा घेतला. तिने सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. सामना ‘गोल्डन स्कोअर’ मध्ये गेला, जिथे अस्मिताने कॅनडाच्या खेळाडूला 2-1 ने पराभूत करत भारतासाठी ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kunal Chandgude : म्हणायचा माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे अन्…, कुणालच्या आईचा पतीवर खळबळजनक आरोप, नवा Video
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे अडचणीत? नाशिकमध्ये केलेल्या कारवाईविरोधात व्यापारी थेट कोर्टात
  • Govinda: गोविंदा कोमलसोबत नवीन Video, कॅमेरा पाहताच केलं असं काही; चर्चांना उधाण
  • Amravati Hospital Fire : 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप
  • सरकारचं सर्वात महत्वाचं पाऊल, कांद्याच्या दरात मोठी घसरण होणार; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in