
कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा संपली असून भारताने या स्पर्धेत 39 मेडल मिळवली आहे. 13 गोल्ड, 17 सिल्व्हर आणि 9 कांस्य पदकं पटकावली. यासह पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर राहिला. भारताने बॉक्सिंग, ज्यूडो, एथलेटिक्स खेळात आपली छाप सोडली. पण काही खेळात भारताला ठसा उमटवता आला नाही. (Photo: PTI)
भारताकडून आर्टिस्टिक जिमनास्टिक क्रीडा प्रकारात आठ स्पर्धांना भाग घेतला होता. पण भारताच्या एकही पदक पडलं नाही. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची निराशा झाली. (Photo: PTI)
लॉन बाउल्स क्रीडा प्रकारात महिला पुरूष असे 9 स्पर्धक उतरले होते. पण यातही पदक मिळालं नाही. हीच स्थिती काहीशी 3×3 बास्केटबॉलमध्ये दिसली. यात आठ संघ सहभागी झाले होते आणि भारताचा सातवा क्रमांक राहिला. (Photo: PTI)
कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत भारताकडून 10 जलतरणपटू उतरले होते. पण कोणलाही मेडल मिळवता आलं नाही. जलतरण क्रीडाप्रकारात भारताचे स्पर्धेक रेसमध्येच नव्हते असं वाटलं. (Photo: PTI)
ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत भाग घेणाऱ्या सात भारतीय स्पर्धकांनी निराशा केली. त्यांच्या खात्यातही पदक पडलं नाही. त्यामुळे भविष्यात या क्रीडाप्रकारांकडे जास्तीचं लक्ष घालावं लागणार आहे. (Photo: PTI)




Leave a Reply