• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Cockroach Janta Party: नाहीतर अमेरिकेत येऊन जीवे मारू… अभिजीत दीपकेंना धमकी देणारा पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर… Video मध्ये काय दिली कबुली?

May 23, 2026 by admin Leave a Comment


Cockroach Janta Party Abhijeet Deepke: क्रॉकरोज जनता पार्टीने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. तरुणाईची भाषा या पक्षाच्या तोंडी असल्याचा दावा अनेकजण करत आहेत. या पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके हे मराठी आहेत. त्यांच्या या पक्षाची केवळ भारतातच नाही तर शेजारील पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश आणि श्रीलंकेतही चर्चा सुरू आहे. अभिजीत दिपके प्रसिद्धीच्या झोतात असताना त्यांना थेट अमेरिकेत जाऊन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आता धमकी देणारी व्यक्ती समोर आली आहे. एका व्हिडिओत या व्यक्तीने दिपके यांना अश्वील भाषेत शिवीगाळ केल्याचेही उघड झाले आहे.

अमेरिकेत येऊन जीवे मारण्याची धमकी?

देशाच्या सरन्यायधीशांनी केलेल्या टीकेनंतर Cockroach Janta Party या डिजिटल राजकीय चळवळीचा जन्म झाला. अभिजीत दिपके या मराठमोळ्या तरुण या चळवळीचे नेतृत्व करत आहे. अवघ्या काही दिवसातच त्याला तरुणाईने डोक्यावर घेतले आहे. त्यापूर्वी कॉक्रोरच जनता पार्टीचे ट्वीटर अकाऊंट सस्पेन्ड करण्यात आले तर आज इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक केल्याची माहिती दिपकेंनी दिली. दरम्यान त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीचा स्क्रीन शॉट दिपकेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केला होता. आपण मांडलेल्या भूमिकेमुळे मला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे दिपके यांनी या पोस्टमधून समोर आणले होते. या मॅसेजमध्ये “तुला पैसा मिळेल. तू खाते बंद कर. नाहीतर भाजपमध्ये ये. नाहीतर तुला अमेरिकेत मारून टाकू” असा मजकूर होता.

Receiving death threats now. pic.twitter.com/agCy94jXEf

— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) May 22, 2026

अभिजीत दिपके यांनी धमकीची माहिती देताच सोशल मीडियावर नेटिझन्सनी तीव्र संताप व्यक्त केला. एका नवीन पक्षाला कोण इतकं घाबरत आहे, असा प्रश्न विचारला गेला. काहींनी देशात लोकशाही आहे की नाही असा सवाल केला. तर काहींनी अभिजीत दिपके यांना पाठिंबा दिला. अनेकजणांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेण्याची सरकारकडे मागणी केली.

कॉकरोच पायखाली दबेल

दरम्यान अभिजीत दिपके यांना धमकी देणारी व्यक्ती आता समोर आली आहे. या व्यक्तिने स्वतः समोर येत या धमकीविषयी मोठा खुलासा केला आहे. त्याने दिपके यांना धमकी दिल्याची कबुली दिली आहे. या व्हिडिओतही धकमी देणारी व्यक्तीने दिपके यांना अश्लील शिवीगाळ केल्याचे दिसून आलं आहे. तर त्याचवेळी क्रॉकरोच पायाखाली दबेल असा गर्भित इशाराही त्याने दिला आहे. या व्हिडिओमुळे खळबळ उडाली असून खुलेआम धमकी देणाऱ्या या व्यक्तीला अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vaibhav Sooryavanshi: तो एक सल्ला अन् श्रीलंकेला हादरवून सोडलं, वैभवच्या रेकॉर्डब्रेक खेळीमागे एक मराठी माणूस जबाबदार
  • देवस्थान इनाम जमीन कायदा लवकरच येणार, पहिल्या बैठकीत रुपरेषा ठरली
  • आयुष्यातील सर्वांत वाईट सकाळ..; मराठी अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, हृदय पिळवटून टाकणारी पोस्ट
  • विद्यार्थ्याने अंडरगारमेंटमध्ये लपवलेले सिम कार्ड अन् मागच्या वर्षीचा पेपर…Neet पुर्नपरीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार
  • Vastu Shastra: रविवारच्या दिवशी करा हे सोपे उपाय; आयुष्यच बदलून जाईल, सर्व आर्थिक संकटं होतील दूर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in