• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP Protest: टोकदार दगडांचा मारा, काचेच्या फेकल्या बाटल्या … विद्यार्थ्यांच्या आडून पोलिसांवर कोणचा हल्ला? हाती लागला महत्त्वाचा पुरावा

July 23, 2026 by admin Leave a Comment


Delhi Jantar Mantar Clash: देशाची राजधानी दिल्लीतील जंतरमंतर हे विद्यार्थी चळवळीचे केंद्र ठरले आहे. आता आंदोलनाला भावनिक साद घातली जात आहे. देशभरातून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण त्याचवेळी पोलिसांवर टोकदार दगड आणि काचेच्या बाटल्या फेकून हल्ले वाढले आहे. विद्यार्थी आंदोलनच्या आडून काही असामाजिक तत्त्वे वातावरण कलुषित करण्याचे प्रयत्न करत असल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा आहे. हे गुंड आणि असामाजित तत्त्व सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. शांततापूर्ण आंदोलनाचा काही गुंड ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. हे गुंड विद्यार्थ्यांच्या गर्दीत घुसतात आणि विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यातूनच पोलिसांवर हल्ले होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांच्या हाती काही सीसीटीव्ही फुटेज लागले आहेत. त्यात ही असामाजिक मंडळी जमा झाल्याचे दिसत आहे. आता ते कोण आहेत आणि त्यांना हे करण्यासाठी कोण मदत करत आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

अचानक दगडांचा मारा आणि वर्दीवर हल्ला

सध्या यासंबंधीचे काही व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यात काही असामाजिक तत्व गर्दीचा फायदा घेत पोलिसांवर हल्ला करताना दिसत आहेत. ते दुरून दगडफेक करतानाचे व्हिडिओही समोर आले आहेत. पोलीस दिसले की अचानक दगडांचा वर्षाव करण्यात येतो. हे दगडही अणकुचीदार असतात. काही ठिकाणी काचेच्या, प्लास्टिकच्या बाटल्या मारून फेकण्यात येत आहे. या हल्ल्यामुळे अचानक गोंधळ उडतो. त्याचा फायदा घेत हे गुंड पळ काढतात.

जनपथ पेट्रोल पंपावरील CCTV फुटेजमध्ये काय?

या हल्ल्ल्यासंबंधीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हे फुटेज 20 जुलै रोजीचे आहे. जनपथ येथील एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत ते कैद झाले आहेत. या सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहेत की आंदोलकांच्या गर्दीत काही असमाजिक तत्त्व घुसतात आणि जोरदार दगडफेक करतात. या फुटेजमध्ये पोलीस कर्मचारी हे दगडफेकीपासून बचावासाठी पळताना दिसत आहेत. दगडफेक करणारे हे पोलीस कर्मचाऱ्यांना लक्ष करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत. या गुंडांचा आंदोलकांशी काहीही संबंध नसल्याचे समोर येत आहे. आता पोलिसांनी या फुटेजच्या मदतीने अशा तरुणांची धरपकड सुरू केली आहे. पुढील तपास करण्यात येत आहे.

जनपथ पेट्रोल पंप का CCTV फुटेज आया सामने. दिल्ली पुलिस सूत्रों के मुताबिक जंतर-मंतर पर जारी प्रदर्शन को असामाजिक तत्वों ने हाईजैक कर लिया है. pic.twitter.com/o89LoZMg99

— alkesh kushwaha (@alkesh_kushwaha) July 23, 2026

आरएमएल रुग्णालयात पोहचेल विशेष पोलीस आयुक्त

22 जुलै रोजी जंतर मंतर परिसरात पुन्हा दगडफेक करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या गर्दीचा फायदा घेत काही लोकांनी दगडफेक केली. त्यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर काल आणि आज विशेष पोलीस आयुक्त देवेश चंद्र श्रीवास्तव आरएमएल रुग्णालयात पोहचले आणि त्यांनी जखमी पोलिसांची विचारपूस केली. अशा असामाजिक तत्तांविरोधात कडक कारवाईचे निर्देश त्यांनी दिले आहेत.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gunratna Sadawarte : जरांगे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा माणूस, गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप
  • Race 4 Movie Update : रेसमधून सलमान-सैफचा पत्ता कट ? चौथ्या पार्टमध्ये कोण दिसणार ?
  • तुकराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! फूड लायसन्स एकदा रद्द झालं की परत मिळत नाही का? जाणून घ्या नियम
  • आदिवासी आंदोलक अण् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी, नाशिकमध्ये वातावरण तापलं, जोरदार घोषणाबाजी
  • आता चिंताच मिटली, भारताला LPG साठी मिळाला नवा भिडू, मोठ्या प्रमाणावर आयात वाढणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in