• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP आंदोलनावरून राजकारण पेटलं; आता वादात CM फडणवीसांच्या लेकीची उडी, म्हणाल्या, ‘ट्रेंडला आंधळेपणाला…’.

July 23, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीच्या जंतर-मंतरवर दिल्ली पोलीस आणि कॉक्रोच जनता पार्टीत मध्यरात्री मोठी झटापट झाली आहे. त्यात 20 जुलौ रोजी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे आंदोलन चांगलंच चिघळलं आहे. त्यानंतर तरुणांच्या आंदोलनाचे भारतभर पडसाद उमटू लागले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. विरोधी पक्षांनी देखील कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे काही ठिकाणी कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलक आणि पोलिसांमध्येही झटापट पाहायला मिळत आहे. त्याचा सत्ताधाऱ्यांकडून विरोध होऊ लागला आहे. आता या वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेकीने उडी घेतली आहे. सोशल मीडियावरील ट्रेंडला आंधळेपणाने पाठिंबा देऊ नये, असा संदेश दिविजा फडणवीस यांनी तरुणांना दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजा फडणवीस यांनी दिल्लीतील CJP आंदोलनाबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्याची जोरदार चर्चा होत आहे. दिविजा फडणवीस म्हणाल्या, लोकशाहीतील विरोधी पक्षाने देशाचे हित डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे. केवळ सत्ताधारी पक्षाचा द्वेष करणे किंवा त्यांची बदनामी करण्याऐवजी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ताधारी पक्षाला चांगले निर्णय घेण्यास मदत केली पाहिजे. सोशल मीडियात गाजणाऱ्या गोष्टीचे आंधळेपणाचे समर्थन करू नका. केवळ ट्रेंड आहे म्हणून बंड करू नका. कोणत्याही विचारसरणीच्या आहारी जाऊन स्वत:ची विचारशक्ती गमावू नका’.

‘जोपर्यंत विद्यार्थ्यांचे हित जपले जात होते. तोपर्यंत ते योग्य आहे. परंतु ज्या क्षणी ही निदर्शने धर्माच्या मुद्द्याकडे वळतात किंवा नीट पेपरफुटी, एनटीए यांच्या मूळ विषयापासून भरकटतात. तेव्हा त्यामागचा उद्देश बदलतो. याबद्दल सावध राहा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिविजा फडणवीस म्हणाले. दिविजा फडणवीस यांच्या वक्तव्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

दिविजा फडणवीस यांनी पुढे स्पष्ट केलं आहे की, ‘तरुणांनी कोणत्याही आंदोलनाला किंवा सोशल मीडियावरील ट्रेंडला आंधळेपणाने पाठिंबा देऊ नये. कोणत्याही विषयावर मत बनवण्याआधी त्यामागची वस्तुस्थिती आणि उद्देश समजून घ्यावा. राजकीय मतभेद असले तरी एकमेकांना वैयक्तिक शत्रू समजू नये. एखाद्या आंदोलनात धार्मिक ध्रुवीकरणाचा रंग येऊ लागला. तर त्या आंदोलनाचा मूळ हेतू बाजूला पडू शकतो, असेही त्यांनी सांगितले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gunratna Sadawarte : जरांगे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा माणूस, गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप
  • Race 4 Movie Update : रेसमधून सलमान-सैफचा पत्ता कट ? चौथ्या पार्टमध्ये कोण दिसणार ?
  • तुकराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! फूड लायसन्स एकदा रद्द झालं की परत मिळत नाही का? जाणून घ्या नियम
  • आदिवासी आंदोलक अण् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी, नाशिकमध्ये वातावरण तापलं, जोरदार घोषणाबाजी
  • आता चिंताच मिटली, भारताला LPG साठी मिळाला नवा भिडू, मोठ्या प्रमाणावर आयात वाढणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in