
CJP आंदोलनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियवर व्हायरल झाले. पण सर्वांचं लक्ष वेधलं ते म्हणजे आंदोलनात पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रिया अहिर हिने… मुंबईत झालेल्या आंदोलनात पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. तेव्हा त्यांनी सोडवण्यासाठी रिया हिने पोलिसांची गाडी अडवण्यासाठी पुढाकार घेतला. पण आता रिया हिचं भवितव्य घडवण्यासाठी किती जण पुढाकार घेतील हे लवकरच कळणार आहे. त्यामागे कारण देखील तसं आहे. रिया हिला ‘बिग बॉस 20’ मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. पण ती बिग बॉसच्या घरात जाणार की नाही? हे फक्त जनता ठरणार आहे.
‘फॅन्स का फैसला’ या संकल्पनेतून दोन दावेदारांपैकी फक्त एकाची निवड होणार आहे. निवड झालेल्या स्पर्धकाला ‘वरदान ऑफ एन एक्ट्रा जीवनदार’ मिळणार असून, त्याला थेट ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश मिळणार आहे… आता अभिनेता समलान खान याने एक प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये त्याने दोन स्पर्धकांची नावे सांगितली असून लव्ह गिल आणि रिया अहिर यांच्यामध्या कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
रिया अहिर हिची सोशल मीडिया पोस्ट
रिया 27 वर्षांची असून सीजेपी आंदोलनानंतर ती चर्चेत आली. आता तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये रिया म्हणते, ‘आतापर्यंत तुम्ही सर्वांनी फक्त माझा प्रवास पाहिला आहे. आता माझ्यासोबत जुडण्यची संधी आहे.’, तिने सांगितलं की, तुम्ही जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) ॲपवर जाऊन मला वोट करु शकता…
पंजाबी अभिनेत्री आणि लव्ह गिल…
लव्ह गिल याच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती पंजाबी अभिनेत्री आहे, तिने पंजाबी टीव्ही विश्वातून अभिनय विश्वात पदार्पण केलं. ‘तू पतंग मैं डोर’ मालिकेत काम केलं. त्यानंतर ‘कुड़ियां जवान बापू परेशान’, ‘शक्कर बारे’ आणि ‘हेटरज’ सिनेमात अभिनेत्री दिसली.
कधी सुरु होणार ‘बिग बॉस 20’
सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 20’ चं प्रसारण 6 सप्टेंबरपासून कलर्स टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्म ‘जिओ हॉटस्टार’वर सुरू होणार आहे. दोन स्पर्धकांची नावे जाहीर झाल्यानंतर, आता उर्वरित स्पर्धकांबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Leave a Reply