
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हॉटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. पुण्यात द नाईन्स नावाच्या त्यांच्या नवीन हॉटेलचे उद्घाटन नुकतेच झाले. या उद्घाटनाला अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांचा समावेश होता, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या उद्घाटनानंतर काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली. तिवारी यांच्या आरोपानुसार, कल्याणीनगरमधील हे हॉटेल २०,००० स्क्वेअर फूट जागेत बांधले असून, त्यासाठी ३५ कोटी रुपये खर्च आल्याचा दावा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील काही महिला नेत्या आणि रुपाली चाकणकर यांच्यात वाद सुरू आहे. त्यातच, चाकणकर यांनी काही जणांवर बदनामीचा आरोप करत गुन्हा देखील दाखल केला होता. आता हॉटेल व्यवसायातील त्यांच्या या नव्या पावलामुळे पुण्यातील राजकारणात नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
Leave a Reply