
Kunal Chandugade Khavdya Dongar Case: छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरुन कुणाल चांदगुडेने वडिलांसोबत झालेल्या झटापटीत उडी मारून जीवन संपवले. त्याला वाचवण्यासाठी पुढे गेलेल्या वडिलांचाही पाय घसरला आणि दोघेही खाली कोसळले. हा संपूर्ण प्रकार आपल्या डोळ्यादेखत घडल्याने त्या धक्क्यातून कुणालची आई संगिता यांनी ही उडी मारून आपले आयुष्य संपवलें. आख्ख कुटुंब एका झटक्यात संपल्याने महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या. आता कुणालच्या मावशीने एक मोठा खुलासा केला आहे.
कुणालचे वडील मुरलीधर हे गेल्या 10 वर्षांपासून ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते. छत्रपती संभाजीनगर ते गुजरात अशी मालवाहू वाहनाची वाहतूक करण्याचे ते काम करत असल्याने 10-15 दिवस ते घराबाहेरच असायचे, ट्रक चालवत असल्याने त्यांना कंबरेचा आजार होता. कंबरेचा आजार असूनही त्यांना त्यांच्या कुटुंबातील कोणीच पाहायला यायचं नाही. या गोष्टीचे संगिता आणि कुणालला फार वाईट वाटलं होतं. चार महिन्यापूर्वी एका लग्नासाठी त्यांच्या गावी गेले होते, तेव्हा लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचा भाचा म्हणजे बहिणीच्या मुलाने आत्महत्या केली.
भाच्याच्या निधनाचा मुरलीधर यांना मोठा धक्का बसला होता. आता भाच्याच्या निधनानंतर मुरलीधर त्यांच्या गावी 10 राहिले होते. ज्या नातेवाइकांनी मागील20 वर्षे आपली साधी विचारपूसही केली नाही. आता वडिल मात्र त्यांच्याकडे अचानक राहायला लागल्याने 19 वर्षांचा कुणाल दुखावला. त्यामुळे कुणालच्या मनात उगाचच वडिलांबद्दल असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असण्याची शक्यता कुणालच्या मावशीने व्यक्त केली. फक्त कुणाललाच नाही तर संगिताला देखील हीच गोष्ट खटकल्याचा दावा कुणालच्या आत्याने केला होता.
दरम्यान, घरच्यांच्या वादानंतरही गावात पंचायत बसवण्यात आली. या पंचायतीत मुरलीधर यांच्या नावावर असलेल्या शेतात त्यांना राहायला अखेर जागा देण्यात आली, असा खुलासा देखील पल्लवी यांनी केला आहे. संगिताने तब्बल चार वर्ष आपल्या मुलांना पाठीला बांधून शेतात काम केले होते. त्यावेळीही मुरलीधर ड्रायव्हर म्हणून काम करत होते. संगिता यांनी आपल्या दोन्ही मुलांना तळहाताप्रमाणे जपले होते. पण मोठा मुलगा आदित्यने आजरामुळे आपले प्राण गमावले. त्यावेळी संगिता पूर्णपणे खचून गेली तिला मानसिक धक्काही बसला होता असा दावा पल्ल्वी यांनी केला आहे.
Leave a Reply