• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बॉबी देओलसोबत मराठमोळ्या अभिनेत्रीचे इंटिमेट सीन्स; म्हणाली ‘शूट करताना मर्यादा..’

August 26, 2026 by admin Leave a Comment


'आश्रम' या वेब सीरिजमध्ये पम्मीची भूमिका अभिनेत्री अदिती पोहणकर घराघरात पोहोचली. या सीरिजमध्ये तिची आणि अभिनेता बॉबी देओलची केमिस्ट्रीही चर्चेत राहिली. दोघांनी काही इंटिमेट सीन्सही शूट केले होते. आता अदितीने या सीन्सच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव आणि कलाकारांमधील कम्फर्ट लेव्हलबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

अदितीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, इंटिमेट सीन्स शूट करताना कलाकारांमध्ये परस्पर विश्वास आणि संवाद असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा प्रसंगांमध्ये दोन्ही कलाकारांनी कम्फर्टेबल आणि सुरक्षित वाटणं गरजेचं असल्याचं ती म्हणाली.

अदितीच्या मते, कॅमेऱ्यासमोर केमिस्ट्री दाखवण्याआधी कलाकारांमध्ये एकमेकांशी मोकळेपणाने संवाद होणं आवश्यक आहे. शूटिंगदरम्यान समोरच्या व्यक्तीला काही अडचण आहे का, ती कम्फर्टेबल आहे का, याची जाणीव ठेवणं महत्त्वाचं असल्याचं तिने सांगितलं.

अदितीने इंटिमेट सीन्सबाबत बोलताना कलाकारांनी आपापल्या मर्यादा समजून घेणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं होतं. तिच्या मते, अशा सीन्समध्ये कोणत्याही कलाकाराला भीती किंवा अस्वस्थता वाटता कामा नये. परस्पर विश्वास असेल तर सीन अधिक सहजपणे शूट करता येतो.

तिने 'शी' आणि 'आश्रम' या दोन्ही प्रोजेक्ट्समध्ये अशा सीन्ससाठी संवाद आणि कम्फर्टला महत्त्व दिल्याचं सांगितल होतं. बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन शूट करणं तिच्यासाठी एक वेगळाच अनुभव असल्याचं अदितीने सांगितलं. एका मुलाखतीत तिने मजेशीर किस्साही शेअर केला.

शूटिंगदरम्यान ती बॉबीला वारंवार “मी ठीक आहे” असं सांगत होती. त्यावर बॉबीने तिला “तू इतकी चिल कशी आहेस पम्मी?”, असं विचारल्याचं अदितीने सांगितलं. बॉबी तिला पम्मी या नावानेच हाक मारत असे. 'आश्रम' या वेब सीरिजमध्ये अदितीने पम्मीची भूमिका साकारली होती, तर बॉबी देओल बाबा निरालाच्या भूमिकेत होता.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
  • वैभव सूर्यवंशीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे…थेट BCCI अन् ICC कडे केली तक्रार, असं का?
  • इस्लामची पुस्तके वाचा, नाहीतर मुलाला दहशतवाद्यांना विकून टाकेन… तिघांच्या मृत्यूनंतर कोचचे काळे कृत्य उघड
  • Sugar price hike : मोठा निर्णय! 5 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही, डी मार्ट, बिगबास्केट आणि ब्लिंकिट… कंपन्यांनी बंदी का घातली?
  • कंत्राटदार संघटनेचा सरकारला मोठा इशारा, मुंबईतील कंत्राटदाराने वैतागून संपवली जीवनयात्रा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in