
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील कंत्राटदारांची 86 हजार कोटी थकबाकी महाराष्ट्र शासनाकडे असून काम करूनही महाराष्ट्र शासनाने पैसे न दिल्यामुळे आतापर्यंत सात कंत्राटदारांनी आपला जीव गमावला आहे. यासोबतच मुंबईमध्ये कंत्राटदारांचे आंदोलनही सुरू आहे. कामाचे पैसे मिळत नसल्याने मोठा संताप कंत्राटदारांकडून व्यक्त केला जात आहे. त्यातच आता एका कंत्राटदाराला आपला जीव गमवावा लागला. महाराष्ट्र शासनाने देयक वेळेवर दिली नाहीत तर महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे मंगेश आवळे यांनी दिला आहे. नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकते यांनी नुकताच आत्महत्या केली. आतापर्यंत कंत्राटदाराचा सातवा बळी आज गेला. ज्यानंतर कंत्राटदार आता आक्रमक भूमिका घेत आहेत.
येत्या आठ दिवसांत रस्त्यावर उतरून आंदोलन करू कंत्राटदार महासंघाने सरकारला इशारा दिला. ज्यामुळे आता सरकारला लवकर निर्णय घ्यावा लागणार असल्याचे स्पष्ट आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र शासनाकडून नवीन निविदा काढण्यात येत आहेत.
पण ज्या कंत्राटदाराची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे अशांनीच निविदा भराव्या आणि काम घ्यावी अन्यथा शासनाकडून थकबाकी राहिल्यास बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते असे देखील नवीन निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांना कंत्रालदार महासंघाने आवाहन केले आहे . नवी मुंबईतील गजानन देवकते या कंत्राटदाराने थकबाकी न मिळाल्याने आत्महत्या केल्यानंतर राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कंत्राटदार महासंघाचे मंगेश आवळे यांची भेट घेतली.
राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा जाहीर करत येत्या काळात आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराच्या कुटुंबीयांना कोणतीही आर्थिक मदत लागली तर आम्ही करू तसेच कंत्राटदार महासंघाच्या माध्यमातून आंदोलनात राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरले असे देखील मनोज प्रधान यांनी सांगितले.
Leave a Reply