• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tukaram Mundhe: रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच मित्रांनी काढला तुकाराम मुंढेंचा फोटो; पुढे जे केलं ते पाहून हसू आवरणार नाही

August 26, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे सध्या त्यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थांच्या ठिकाणी स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता आणि नियमांचं पालन याबाबत ते सातत्याने कठोर भूमिका घेत आहेत. त्यांच्या या कारवाईचा धसका अनेकांनी घेतला आहे. याचाच एक मजेशीर नमुना मुंबईत पाहायला मिळाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईतील काही मित्र रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी गेले होते. मात्र जेवण ऑर्डर करण्यापूर्वी त्यांनी एक भन्नाट शक्कल लढवली.

या मित्रांनी त्यांच्या मोबाइलच्या स्क्रीनवर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा फोटो लावला आणि तो फोटो थेट टेबलावर ठेवला. त्यानंतर त्यांनी निवांतपणे जेवणाची ऑर्डर दिली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ ऋत्विक शेट्टीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मित्र या मजेशीर प्रकाराचा आनंद घेताना दिसत आहेत. टेबलावर तुकाराम मुंढेंचा फोटो पाहून वेटरलाही हसू आवरता आलं नाही. हा साधा विनोद असला तरी सध्या मुंढेंच्या नावाची अन्नसुरक्षेशी जोडलेली प्रतिमा किती मजबूत झाली आहे, याची झलक यातून पहायला मिळते.

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Rithvik Shetty (@rithv1k7)

तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कठोर मोहीम सुरू केली आहे. रेस्टॉरंट, हॉटेल आणि इतर खाद्यविक्रीच्या ठिकाणी स्वच्छता तसंच अन्नसुरक्षेच्या नियमांची तपासणी केली जात आहे. त्यांच्या कारवाईदरम्यान अस्वच्छ किचन, मुदतबाह्य पदार्थ आणि इतर नियमभंगाच्या घटना समोर आल्या आहेत. त्यांच्या या मोहिमेमुळे अनेक खाद्यव्यवसायांमध्ये स्वच्छतेबाबत अधिक खबरदारी घेतली जात असल्याचंही वृत्त आहे. तुकाराम मुंढेंचा फोटो टेबलावर ठेवून जेवण ऑर्डर करण्याच्या या मजेशीर कल्पनेनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काहींसाठी हा केवळ विनोदाचा भाग असला तरी त्यामागे अन्नाच्या गुणवत्तेबाबत वाढलेली जागरुकताही दिसून येते.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मुंढेंचा फोटो ठेवला की जेवणाची क्वालिटी आपोआप चांगली होणार, असं म्हटलंय. तर काहींना आता रेस्टॉरंटमध्ये जाण्याआधी मेन्यूसोबत मुंढेंचा फोटोही घेऊन जावा लागणार, अशा गमतीशीर कमेंट्स केल्या आहेत. काही युजर्सनी या व्हिडीओमागील संदेशाचं कौतुक केलं आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर फटका, तब्बल 35 हजार लोकांनी केले अनफॉलो..
  • Nepal Flood: पत्याच्या बंगल्यासारखी कोसळली घरं, हजारो लोक गेले वाहून, अंगावर काटा येईल असं पुराचं रौद्र रुप
  • डोळ्यांची 85% दृष्टी गेली, तब्येत बिघडली… इम्रान खान यांची तुरुंगात बिकट अवस्था, मुलांनी केला खुलासा
  • आंतरजातीय विवाह करणारे होणार लखपती, सरकारची मोठी घोषणा, मिळणार इतके पैसे
  • MPSC Paper Leak : लव्ह स्टोरीमुळे फुटला MPSC चा पेपर, तपासातून धक्कादायक माहिती समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in