• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आंतरजातीय विवाह करणारे होणार लखपती, सरकारची मोठी घोषणा, मिळणार इतके पैसे

August 26, 2026 by admin Leave a Comment


बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी राज्यातील महिलांसाठी विशेष करून अनुसूचित जाती आणि जमातीमधील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. अनुसूचित जाती आणि जमातीमधील ज्या महिला आंतरजातीय विवाह करतील त्यांना बिहार सरकारकडून 1.25 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. एवढंच नाही तर केंद्र सरकारकडून देखील 1.25 लाख रुपये मिळणार आहेत. याचाच अर्थ आता ज्या महिला आंतरजातीय विवाह करणार आहेत, त्यांना केंद्र आणि राज्य सरकार मिळून अडीच लाख रुपयांची मदत मिळणार आहे. तसेच रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी महिलांच्या रोजगारामध्ये वाढ व्हावी आणि त्यांना आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी विविध उपक्रम देखील सुरू केले आहेत.

महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम

महिलांच्या आरोग्यसाठी बिहार सरकारकडून आता महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर बिहार सरकारकडून अॅनिमिया मुक्त बिहार उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. महिला आणि बालकांचं आरोग्य सुधारावं या उद्देशातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आल्याचं यावेळी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी म्हटलं आहे. या अभियानांतर्गत गर्भवती माता, लहान मुलं आणि महिलांच्या आरोग्याची नियमित तपासणी करण्यात येणार आहे, तसेच त्यांना आवश्यकतेनुसार उपचाराच्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत, अशी माहिती बिहार सरकारने दिली आहे. हे विशेष अभियान 25 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर 2026 या काळात राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून बिहारमधील 1 कोटी 20 लाख 82 हजार 500 महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे.

एवढंच नाही तर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची पूर्व परीक्षा उत्तीर्ण करतील त्यांना देखील प्रोत्साहन म्हणून बिहार सरकारच्या वतीने तीस हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थच्या निवडणुकांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण दिलं जाणार असल्याची घोषणा देखील सरकारच्या वतीने करण्यात आली आहे, स्थानिक प्रशासनामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा यावेळी करण्यात आल्या आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्याचे भाव घसरला, आज 10 ग्रॅमसाठी…
  • प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
  • लग्नानंतर नवऱ्याने सासरी राहायचं, भन्नाट रोमँटिक कॉमेडी सिनेमा; ओटीटीवर नंबर 1 वर होतोय ट्रेंड
  • MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल
  • ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर फटका, तब्बल 35 हजार लोकांनी केले अनफॉलो..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in