• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! महाराष्ट्र ड्रग इंस्पेक्टर परीक्षा रद्द, पेपर लीकचा आरोप झाल्यानंतर मोठा निर्णय

August 26, 2026 by admin Leave a Comment


मोठी बातमी समोर येत आहे. नीटसह इतर काही परीक्षेचे पेपर लीक झाल्याची प्रकरण समोर येत आहेत. नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याचं समोर आल्यानंतर ही परीक्षा रद्द करून पुन्हा एकदा नीटची परीक्षा घेण्यात आली होती. दरम्यान त्यावरून देशभरात वातावरण तापलेलं असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. फूड अँन्ड ड्रग्ज विभागात ड्रग्ज इंस्पेक्टर ग्रुप बी या पदाच्या भरतीसाठी आयोजित करण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पेपरमध्ये अनियमितता आणि पेपर लीक झाल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई क्राइम ब्रँचकडून सुरू करण्यात आला होता. या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, ही परीक्षा सुरू होण्यापूर्वीच एका विद्यार्थ्याकडे या परीक्षेचा प्रश्नसंच पोहोचला होता. त्यानंतर आता ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ड्रग इंस्पेक्टर ग्रुप ब भरतीसाठी महाराष्ट्र शासनाने 29 जुलाई 2025 जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानतंर मार्च 2026 ला चाळणी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही परीक्षा राज्यातील सहा विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजीत करण्यात आली होती. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. मात्र या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा तसेच पेपर लीक झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. काही विद्यार्थ्यांकडे परीक्षेपूर्वीच प्रश्नसंच पोहोचल्याचा आरोप होत होता. विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या संदर्भात 27 जुलै रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं आढळून आलं की, ही परीक्षा सुरू होण्यापूर्वीच एका विद्यार्थ्याकडे या परीक्षेचा प्रश्नसंच पोहोचला होता, आणि त्याला त्याचा या परीक्षेत फायदा देखील झाला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Snake : साप पुन्हा आयुष्यात तुमच्या घराकडे फिरकणार नाही, आदिवासी लोकांची ही खास ट्रीक प्रत्येकाला माहिती हवीच
  • Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्याचे भाव घसरला, आज 10 ग्रॅमसाठी…
  • प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
  • लग्नानंतर नवऱ्याने सासरी राहायचं, भन्नाट रोमँटिक कॉमेडी सिनेमा; ओटीटीवर नंबर 1 वर होतोय ट्रेंड
  • MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in