• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वैभव सूर्यवंशीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे…थेट BCCI अन् ICC कडे केली तक्रार, असं का?

August 26, 2026 by admin Leave a Comment

IND vs SL Test Series: भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सध्या सुरु आहे.  या सामन्यातील अगदी पहिल्याच दिवशी मैदानात जोरदार राडा झाला. या सामन्यातील पहिल्याच दिवशी यशस्वी जयस्वाल आणि असिथ फर्नांडो यांच्यात प्रचंग वाद झाला. आता या वादानंतर आयसीसीने मोठी कारावाई सुद्धा केली. आता यानंतर माजी फलंदाजाने एक भलतीच मागणी केली आहे.

वैभव सूर्यवंशी सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्यात व्यस्त आहे. तर दुसरीकडे, यशस्वी जयस्वाल श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाकडून खेळत आहे. आता या दोन खेळाडूंबाबत आयसीसी आणि बीसीसीआयकडे एक जोरदार आवाहन करण्यात आले आहे. हे आवाहन भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी केले आहे. संजय मांजरेकर यांनी आयसीसी आणि बीसीसीआयला सांगितले की, त्यांना शिक्षा न देऊन त्यांना बिघडवले जात आहे. त्यांना त्याच चुका पुन्हा करण्याची सवय लावली जात आहे. हे खेळासाठी चांगले लक्षण नाही.

संजय मांजरेकर यांनी त्यांच्या ‘एक्स’ हँडलवरून वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांच्याबाबत आयसीसी आणि बीसीसीआयकडे आवाहन केले. त्यांनी लिहिले, “आयसीसी आणि बीसीसीआय, अलीकडेच इंडिया ‘ए’ संघाकडून खेळणारा वैभव आणि आता जयस्वाल, जर तुम्ही त्यांना गैरवर्तनाबद्दल शिक्षा न देता असेच सोडून देत राहिलात, तर तुम्ही त्यांना तेच वर्तन पुन्हा करण्याची सवय लावत आहात. हे खेळासाठी आणि विशेषतः त्यांच्या स्वतःच्या भविष्यासाठी चांगले नाही.”

हसंजय मांजरेकर यांचे अपील वैभव आणि यशस्वीच्या अलीकडील गैरवर्तनाशी संबंधित आहे. कोलंबो येथील दुसऱ्या कसोटीदरम्यान यशस्वी जैस्वालचा श्रीलंकन ​​गोलंदाज असिथा फर्नांडोसोबत वाद झाला होता, ज्यामुळे केवळ वादच निर्माण झाला नाही, तर त्याच्या कृतीबद्दल यशस्वीवर टीकाही झाली. यशस्वी जैस्वालला फक्त त्याच्या सामन्याच्या मानधनाचा दंड ठोठावण्यात आला.

याचप्रमाणे, भारत ‘अ’ संघाच्या सामन्यादरम्यान, वैभव सूर्यवंशीचा श्रीलंका ‘अ’ संघाचा खेळाडू विशन हलंबगेसोबत वाद झाला होता. वैभव सूर्यवंशीच्या वागणुकीमुळे, या १५ वर्षीय खेळाडूवर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई होईल का, असा प्रश्न निर्माण झाला होता. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, या प्रकरणात भारतीय मंडळाचा कोणताही सहभाग नाही.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MPSC Paper Leak : लव्ह स्टोरीमुळे फुटला MPSC चा पेपर, तपासातून धक्कादायक माहिती समोर
  • Khavdya Donger : खवड्या डोंगर प्रकरणात हैराण करणारा ट्विस्ट, कुणालला जीव द्यायचाच नव्हता? मोठं कारण आलं समोर
  • मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
  • Tukaram Mundhe: रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच मित्रांनी काढला तुकाराम मुंढेंचा फोटो; पुढे जे केलं ते पाहून हसू आवरणार नाही
  • मोठी बातमी! महाराष्ट्र ड्रग इंस्पेक्टर परीक्षा रद्द, पेपर लीकचा आरोप झाल्यानंतर मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in