• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जगात खळबळ! अमेरिकेने घेतला व्हिसाबद्दल अत्यंत धक्कादायक निर्णय, थेट नियोजित..

August 26, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेने जगाची झोप उडवणारा निर्णय घेतला. अमेरिकेने जगभरातील अर्जदारांसाठी व्हिसा भेटीची नियोजित प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतला. ज्याने मोठा दणका लोकांना बसला. डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून व्हिसाच्या प्रक्रियेबद्दल अधिक कठोर होताना दिसत आहेत. अमेरिका फस्ट हे त्यांचे धोरण आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये अमेरिकेतील लोकांना रोजगार मिळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यातच आता हे मोठे पाऊल त्यांच्याकडून उचलण्यात आले. प्रशासनाकडून अंमलात आणल्या जाणाऱ्या कठोर स्थलांतर धोरणांच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, जगभरातील अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमध्ये एक जागतिक प्रशिक्षण सुरू करण्यात आले.

या प्रशिक्षणासाठी सोय व्हावी, याकरिता व्हिसा सेवेसाठी भेटीतील वेळांमध्ये काही बदल केले आहेत. आता अमेरिकेत जाणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. अमेरिकेतून व्यक्तींना हद्दपार करण्यासाठी आणि स्थलांतर धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी थेट आता आक्रमकपणे मोहिम राबवली जात आहे. ग्रीन कार्ड रद्द, व्हिसा रद्द अशा अनेक गोष्टींचा यात समावेश आहे.

अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले की, या धोरणामुळे राष्ट्रीय सुरक्षा अधिक चांगली करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, धोरणात्मक कायदेशीर अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. H-1B व्हिसाच्याही नियमात अनेक बदल करण्यात आलीत. यासोबतच मोठे शुल्क आकारण्यात आलेत. ज्यामुळे H-1B व्हिसावर अमेरिकेत जाणे दिवसेंदिवस कठीण होत आहे.

त्यातच आता मुलाखती स्थगित करण्यात आल्यात. H-1B व्हिसासोबतच अनेक नियमात त्यांनी बदल केले आहेत. B1 व्हिसा सामान्यतः व्यावसायिक दौऱ्यांसाठी दिले जातात. B2 व्हिसा पर्यटन, कुटुंबातील व्यक्तींची भेट किंवा वैद्यकीय उपचारांसाठी दिला जातो. या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना हे सिद्ध करावे लागते की, त्यांचा अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याचा कोणताही इरादा नाही आणि ते पुन्हा त्यांच्या देशात परततील. मात्र, आता सतत अमेरिकेकडून व्हिसाच्या नियमात बदल केले जात आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क…
  • बॉबी देओलसोबत मराठमोळ्या अभिनेत्रीचे इंटिमेट सीन्स; म्हणाली ‘शूट करताना मर्यादा..’
  • जरांगे, हाकेंना आंदोलनाआधीच मोठा झटका? गृहविभागाचे तातडीचे आदेश; आता आझाद मैदानात…
  • तुमच्या फोन आणि सिम कार्डमध्ये सोने असते! ते काढून पैसे कमावता येतात का?
  • सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in