• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP आंदोलनात पोलिसांनी गाडी अडवणाऱ्या रियाला ‘किन्नर’ म्हणून हिणवलं; रेट ठरवल्याचे स्क्रीनशॉट शेअर करत चांगलंच सुनावलं

September 8, 2026 by admin Leave a Comment


CJP आंदोलक रिया अहीर सध्या सर्वत्र चर्चेत आहे. अनेकांना असं वाटलं की, रिया आभिनेता सलमान खान याच्या ‘बिग बॉस 20’ शोमध्ये दिसेल. पण ते शक्य होऊ शकलं नाही. अखेर पंजाबी अभिनेत्री लव गिल हिला प्रेक्षकांनी जिंकवलं आणि रिया हिला माघार घ्यावी लागली. ‘बिग बॉस 20’ च्या निकालानंतर आपल्याबद्दल केलेल्या अपमानास्पद टिप्पण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रिया अहीर हिने सोशल मीडियाचा मोठा आधार घेतला. एवढंच नाही तर, ‘किन्नर’ म्हणणाऱ्यांना देखील रिया हिने चांगलंच सुनावलं आहे. रिया हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केले आहे. तिचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

किन्नर म्हणणाऱ्यांना रियाने सुनावलं…

आपल्याला ‘किन्नर’ असं संबोधणाऱ्या एका ‘ट्रोल’ला विशेषत्वाने उत्तर देताना रिया अहिर म्हणाली, “कोणाला तरी ‘किन्नर’ म्हणून आपण काहीतरी मोठं काम करत आहोत, असं त्यांना वाटतं. आपल्या देशात किन्नर समुदाय हा अत्यंत खंबीर समुदाय आहे. त्यामुळे, तुम्हाला हा अपमान वाटत असला तरी, मी मात्र याला अपमान मानत नाही.”, असं रिया म्हणाली. सध्या सर्वत्र रिया हिची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, रिया हिने 140 रुपयांवर देखील वक्तव्य केलं आहे. तिने काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या टीकेला उत्तर देण्यापूर्वी, रिया अहीरने आपल्या चाहत्यांचे त्यांच्या मतांसाठी आभार मानणारा एक व्हिडिओ पोस्ट केलेला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ʀʜɪʏᴀ ʏᴀᴅᴀᴠ (@rhiyaahir)

कोण आहे रिया अहिर?

रिया ही एक मॉडेल, अभिनेत्री, होस्ट आणि एंटरप्रेन्योर आहे. एवढंच नाही तर, नाट्यक्षेत्र, जाहिराती आणि म्युझिक व्हिडिओंच्या माध्यमातून एक दशकाहून अधिक काळ अनुभव घेतल्यानंतर तिने ‘रियासत’ (Rhiyasat) हा आपला ‘एथनिक फॅशन’ ब्रँड सुरू केला. नुकताच, ‘नीट’ (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात ‘सीजेपी’च्या (CJP) नेतृत्वाखाली झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. सध्या सर्वत्र फक्त रिया हिची चर्चा रंगली आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्वाची बैठक, सरकारकडून..
  • Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
  • Million Dollar Grits: चमचमीत नाश्ता हवाय? असे तयार करा मलाईदार आणि चवदार ग्रिट्स
  • पेपरफुटी प्रकरणात संजय राऊत यांचा नवा गौप्यस्फोट; भाजपवर काय केले आरोप?
  • कोण आहेत न्यामूर्ती बी.वी. नागरत्ना? भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होण्याचा मान मिळणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in