
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज चक्क महापौर बंगल्यावर जाऊन रक्षा बंधनाचा सण साजरा केला. यावेळी आजी आणि माजी महापौरांनी एकमेकांना राखी बांधत शुभेच्छा दिल्या. आणि यावेळी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ देखील उपस्थित होत्या. एरव्ही विरोधी बाकांवरुन टीकेचे बाण सोडणाऱ्या किशोरी पेडणेकर यांनी रितू तावडे आण चित्रा वाघ या राजकीय विरोधकांसोबत या सण साजरा केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांसोबतही रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापौर बंगल्यावर जाऊन स्वामींच्या मूर्तींना राखी बांधत रक्षाबंधन साजरे केले.यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ देखील यावेळी हजर होत्या.या अनोख्या भेटीबद्दल बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की आपण महापौर असताना स्वामींच्या मूर्तीची स्थापना केली होती. तेव्हा पासून त्या स्वामींना राखी बांधण्यासाठी महापौर निवासस्थानी जात असतात.
या अनोख्या भेटीबद्दल किशोरी पेडणेकर म्हणाल्या की रक्षाबंधनाला मी हनुमंत आणि स्वामींना राखी बांधत असते. या महापौर बंगल्याच्या पाठीमागे स्वामींच्या औंदुबर झाडाचं पुजन मी करत असते. यंदाही मी इथे येऊन रक्षाबंधन साजरे केले आहे. महापौर बंगल्याशी हे भावनिक नातं जोडलं गेलंय. त्यामुळे मी सहपरिवार येथे येऊन रक्षाबंधन साजरे केले. आज चित्रा वाघ, महापौर रितु तावडे यांच्याशीही इथेच भेट झाली. राजकारणात मतभेद राहणारच, आम्ही आपापली भूमिका मांडणार आहोत. मात्र त्यापलीकडे ही नाती असल्याचे त्यांनी सांगितले.
किशोरी पेडणेकर यांनी स्वामींच्या मूर्तीची महापौर बंगल्यावर स्थापना केली आहे. किशोरी ताईंनी स्वामींचं दर्शन घेतलं, त्यांना राखी बांधली. आज आम्ही सफाई कर्मचा-यांसोबतही रक्षाबंधन साजरे केले. पक्षभेद, मतभेद असू शकतात आमच्यात मनभेद नाहीत. किशोरी ताई आणि मी दोघेही कोकणकन्या आहोत. त्यादृष्टीनं आमचं प्रेम वेगळं असल्याचे महापौर रितु तावडे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त मुंबईत १ महिना सेवा उपक्रम राबवले जाणार आहेत. या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या भेटीत विस्तृत चर्चा झाल्याचे देखील महापौर रितू तावडे यांनी यावेळी सांगितले.
किशोरी पेडणेकर यांची मी फॅन आहे
किशोरी पेडणेकर यांची मी फॅन आहे, रितुही छान काम करते. आज दुग्ध शर्करा योग जुळून आला. दोघींनी एकमेकींना राखी बांधली आणि मी या मंगल प्रसंगाची साक्षीदार आहे. आज एक स्ट्रॉन्ग मेसेज गेलाय की मतभेद असतील पण मनभेद नाहीत. राजकारणात काम करताना महिलांना अनेक कसोट्या पार पाडव्या लागतात. काम करतांना आम्ही शत्रु नाहीत, एकमेकींची ताकद आहोत. हा बॉन्ड कायम राहील असे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या भेटीबद्दल सांगितले. आज आपण रक्षाबंधनाच्या दिवशी खास रितु तावडे यांना भेटायला आले होते असेही त्या म्हणाल्या.
Leave a Reply