“संपूर्ण जगाचा विद्धवंस होईल अशा पद्धतीच हे युद्ध सुरु होतं. हजारो लोक मारले गेले. आखाती राष्ट्रामधल्या दुबई, कुवैत, बहरीन, इस्रायल अशा अनेक ठिकाणी शेकडो लोकं मारली गेली. पण इराण सारखा देश हा इस्रायल आणि अमेरिकेसारख्या महाशक्तींना शरण गेला नाही. 35 दिवसापेक्षा जास्त काळ अमेरिका, इस्रायलला झुंजवत ठेवलं. अमेरिका, इस्रायलविषयी जी फालतू भिती होती ती इराणने […]
india
Weather Updates : अवकाळीचं संकट टळणार ? पण दिलासा नाहीच, हवामान विभागाच नवा अलर्ट
गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रातील विविद भागात अवकाळीचं संकट घोंगावत आहे. पाऊस, गारपीट यामुळे पिकांनाही मोठा फटका बसला असून शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. पावसाच्या संकटामुळे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी डोक्याला हात लावून बसला होता. मात्र आता राज्यात हवापालट होत असल्याचे चित्र दिसत आहे. पूर्वमोसमी पावसाच्या उघडिपीनंतर उन्हाचा चटका वाढू लागला आहे. आज राज्याला पावसाचा कोमताही मोठा […]
तो आला, त्याने पाहिलं अन्…; मुंबईत बिबट्याचा धुमाकूळ, Video पाहून तुम्हालाही वाटेल भीती
गेल्या काही दिवसांपासून मानवी वस्तीत बिबट्यांचा शिरकाव वाढला आहे. त्यातच आता मुंबईतील गोरेगाव परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये बिबट्या शिरल्याची घटना समोर आली आहे. गोरेगावमधील दिंडोशी परिसरातील रहेजा हाईट्स सोसायटीमध्ये बिबट्याने शिरुन कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या सर्व थरार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामुळे या सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले […]
Iran-US Ceasefire: युद्धविराम होताच इराणने का मानले पाकिस्तानचे धन्यवाद? शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर ठरले देवदूत? भारताच्या हाती लागलं काय?
Iran-US Ceasefire: गेल्या एक महिन्याहून अधिक काळ सुरू असलेल्या इराण विरुद्ध इस्त्रायल-अमेरिका युद्धाला अखेर विराम मिळाला. दोन आठवडे मध्य-पूर्वेत युद्धविरामाची घोषणा झाली. युद्धविराम होताच इराणने सर्वात अगोदर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांचे आभार मानले. पाकिस्तान आतंतरराष्ट्रीय मंचावर वेळीच योग्य भूमिका घेण्यात यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास […]
US Iran Ceasefire : पाकिस्तान फक्त नावाला, शेवटच्या एक तासात या देशाने फिरवला गेम म्हणून इराण सीजफायरसाठी झाला तयार
US Iran Ceasefire for 2 Weeks : मागच्या अनेक दिवसांपासून जगाचं लक्ष ज्या निर्णयाकडे लागलं होतं, ती घोषणा अखेर आज झाली. सगळ्या जगाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. मध्य पूर्वेमध्ये आता पुन्हा एकदा शांतता निर्माण होईल अशी आशा निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली आहे. हा युद्धविराम दोन आठवड्यांसाठी आहे. अमेरिकेचे राष्ट्र्राध्यक्ष डोनाल्ड […]
Maharashtra News LIVE : ऊर्जा, पूजा, शरीरशांती आणि…, भोंदू अशोक खरातच्या तक्रारींचा आकडा वाढला
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तक्रारींचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. आता पर्यंत पीडित महिलांच्या एकूण 19 तक्रारी दाखल झाल्या आहेत. ‘ऊर्जा, पूजा आणि शरीरशांती’च्या नावाखाली शोषण केल्याचे आरोप आहेत. भोंदूबाबा अशोक खरातविरुद्ध आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झाले आहेत. नगर-पुणे महामार्गावर चास घाटात दारूच्या ट्रकचा भीषण अपघात […]