आयपीएलच्या 19 व्या मोसमाची 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात होण्यासाठी आता फक्त 6 दिवस बाकी आहेत. मात्र त्याआधी विविध संघांतील खेळाडूंना दुखापतीमुळे संपूर्ण 19 व्या मोसमातून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे संबंधित संघांची डोकेदुखी वाढली आहे. इतर संघांच्या तुलनेत कोलकाता नाईट रायडर्स टीमच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली झाली आहे. केकेआरच्या 2 गोलंदाजांना […]
cricket
IPL 2026 : 19 व्या मोसमाचं उर्वरित वेळापत्रक केव्हा जाहीर होणार? जाणून घ्या
आयपीएलच्या 19 व्या मोसमाची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे. बीसीसीआयने 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 11 मार्च रोजी फक्त पहिल्या 20 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार 28 मार्च ते 12 एप्रिल दरम्यान एकूण 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. तर उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक हे विधानसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर करण्यात आल्यानंतर केलं जाईल, असं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला […]
NZ vs SA: दक्षिण आफ्रिकेचा निर्णायक सामन्यात विजय, न्यूझीलंडला पराभूत करत मालिकेत बरोबरी
दक्षिण आफ्रिकेने चौथ्या आणि करो या मरो अशा टी 20i सामन्यात यजमान न्यूझीलंडला पराभूत करत मालिकेतील आव्हान कायम राखलं आहे. दक्षिण आफ्रिकेने या 5 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली होती. मात्र त्यानंतर यजमान न्यूझीलंडने सलग 2 सामने जिंकून मालिका विजयाचा दावा मजबूत केला होता. त्यामुळे न्यूझीलंडला विजयी हॅट्रिकसह मालिका जिंकण्याची दुहेरी संधी होती. तर दक्षिण […]
चल निघ… ईशान आणि झीशानमध्ये जुंफली! मैदानावरच ‘त्या’ कृत्याने चाहत्यांनाही संताप, नेमकं काय घडलं?
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 ची सुरुवात होण्यापूर्वी सर्व संघ जोरदार तयारीत आहेत. सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघही सराव सामन्यांद्वारे आपली रणनीती अंतिम करत आहे. मात्र, नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे अद्याप संघात दाखल झालेला नाही. त्यामुळे सुरुवातीचे काही सामने तो खेळू शकणार नाही. या काळात संघाची कमान डावखुरा फलंदाज ईशान किशन याच्याकडे सोपवण्यात आली आहे. […]
Vaibhav Suryavanshi: ख्रिस गेल याचा IPL रेकॉर्ड तुटणार? वैभव सूर्यवंशी 175 धावांहून अधिकचा महाडोंगर उभारणार? तुफान चर्चा
Vaibhav Suryavanshi IPL Run Records: आयपीएल 2026 लवकरच सुरू होणार आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी मोठी कमाल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ख्रिस गेल याने आयपीएलमध्ये 175 धावांचा डोंगर उभारला आहे. त्याचा हा रेकॉर्ड तोडण्याची संधी कमी वयात वैभव सूर्यवंशी याला आहे. त्यालाही हा आकडा ओलांडून धावांचा महाडोंगर उभा करायचा आहे. त्यासाठी राजस्थान रॉयल्सचा […]
IPL 2026: रोहित शर्मा किंवा एमएस धोनी नाही तर हा आहे आयपीएलचा बेस्ट कर्णधार, आकडेवारी वाचा
आयपीएलचं 19वं पर्व 28 मार्चपासून सुरू होत आहे. आतापर्यंत पार पडलेल्या 18 पर्वात काही फ्रेंचायझींचा दबदबा दिसून आला आहे. यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स पाच जेतेपदांसह आघाडीवर आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्सने तीन जेतेपद पटकावले आहे. अशा स्थितीत आयपीएलचा बेस्ट कर्णधार कोण याची चर्चा रंगणार हे सहाजिकच आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर […]