
अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करत असलेला ‘बिग बॉस मराठी सीजन 6’ हा शो 11 जानेवारी रोजी सुरू झाला आणि तीन महिन्यांहून अधिक काळ चालला. अशातच आज या सीजन 6 चा विजेता कोण होणार? हे काही तासांमध्ये कळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सीजनमधील अनेक स्पर्धकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. यामध्ये सर्वात चर्चेत राहिली ती म्हणजे ड्रामा क्वीन राखी सावंत. तिने प्रेक्षकांना प्रचंड हसवलं. तर या सीजनमध्ये राकेश बापटने देखील धडाकेबाज गेम खेळत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या सीजनमध्ये शेवटचे पाच स्पर्धक राहिले असून यामधील बिग बॉस सीजन 6 ची ट्रॉफी कोण घेऊन जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बिग बॉस फिनाले संदर्भातील प्रत्येक घडामोडी पाहा फक्त एका क्लिकवर
Leave a Reply