• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराणकडून भारतीय जहाजांवर गोळीबार, भारत सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये घेतला सर्वात मोठा निर्णय, आता थेट…

April 19, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविरामानंतर देखील संघर्ष सुरूच आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये मोठा तणाव पहायला मिळत आहे. इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर अमेरिकेनं घेतलेल्या भूमिकेमुळे इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज दुसऱ्याच दिवशी बंद केला. या दरम्यान एक मोठी घटना घडली, ती म्हणजे इराणकडून दोन भारतीय जहाजांवर हल्ला करण्यात आला. ही जहाजं तेल घेऊन स्ट्रेट ऑफ होर्मूज पार करण्याच्या प्रयत्नात होती. मात्र अचानक इराणकडून गोळीबार झाल्यानं या जहाजांना यूटर्न घ्यावा लागला. समोर आलेल्या माहितीनुसार इराणने 20 जहाजांना स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून माघारी पाठवले आहे, त्यात दोन भारतीय जहाजांचा देखील समावेश होता.

दरम्यान इराणकडून भारतीय जहाजांवर हल्ला करण्यात आल्यानंतर आता भारत सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. भारत सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. शनिवारीच पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या अध्यक्षतेमध्ये कॅबिनेटची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये भारतीय झेंडे असलेल्या जहाजांना तब्बल 12,980 कोटी रुपयांच्या गॅरंटी सोबत देशांतर्गत विमा सुविधा देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. सध्या मध्य पूर्वेत प्रचंड तणाव पहायला मिळत आहे, याचा परिणाम म्हणून इंश्योरंसच्या प्रीमियममध्ये देखील वाढ झाली आहे, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या नव्या योजनेला ‘भारत मॅरीटाइम इंशोरंस पूल’ (बीएमआई पूल) असं नाव देण्यात आला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे भारतीय झेंडा असलेल्या त्या सर्व जहाजांना स्वस्तात विमा उपलब्ध करून देण्याचा आहे, जे जहाज कोणत्याही देशामधून भारतीय बंदरावर सामानाची वाहतूक करण्याचं काम करतात. याचा या जहाजांना मोठा फायदा होणार आहे. भारतीय जहाजांना स्वस्तात विमा उपलब्द होणार आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तुम्ही देखील या पाच चुका करतायेत का? तर मनी प्लांटमुळे होईल तुमचं मोठं नुकसान
  • मुलीच्या मैत्रिणीवरच नराधम बापाचा अत्याचार, पिडीत मुलीने विषप्राशन केल्याने खळबळ
  • मोठी बातमी! अखेर इराणचा मित्र मैदानात, अमेरिकेला थरकाप उडवणारी धमकी, युद्ध पुन्हा सुरू होणार? जगभरात खळबळ
  • GK : पंक्चर झाल्यावर ट्यूबलेस टायर असलेली बाईक किती दूर जाऊ शकते?
  • ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, किलिंग मशिनला नष्ट करण्याची वेळ आली…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in