• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, किलिंग मशिनला नष्ट करण्याची वेळ आली…

April 19, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी ( 19 एप्रिल 2026 ) इराणला संपूर्णपणे नष्ट करण्याची धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की इराणला आता सोडता कामा नये. ते लवकरच आणि सहज झुकतील आणि त्यांनी समझोता केला नाही तर त्यांना तो अवश्य करावा लागेल. आणि तो करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल. जे गेल्या ४७ वर्षांत इतर राष्ट्राध्यक्षांनी करायला हवे होते. आता वेळ आली आहे की इराणच्या किलिंग मशीनचा अंत व्हावा.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर शेअर केली पोस्ट

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी १९ एप्रिल रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एक पोस्ट शेअर करुन इराणला मोठा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी ईराणवर सीजफायरचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत म्हटले की इराणने काल शनिवारी ( १८ एप्रिल ) स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये गोळीबार केला. हा आमच्या दरम्यान झालेल्या सीजफायरचे संपूर्णपणे उल्लंघन आहे. यापैकी अनेक गोळ्या एका फ्रान्सच्या जहाजाला आणि युकेच्या एका मालवाहू जहाजाच्या (Freighter) दिशेने डागल्या होत्या. हे योग्य नव्हते, बरोबर ना?’

ते पुढे म्हणाले की माझे प्रतिनिधी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे जात आहेत. ते उद्या सोमवारी ( २० एप्रिल २०२६ ) सायंकाळपर्यंत
चर्चेसाठी पोहचतील. ‘

होर्मुझच्या नाकेबंदीने इराणचे होत आहे नुकसान- ट्रम्प

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, इराणने अलिकडेच घोषणा केली होती की तो होर्मुझ स्ट्रेटला बंद करत आहे, जे खूपच अजब गोष्ट आहे. कारण आमची नाकेबंदीमुळे होर्मुझ आधीच बंद झाली आहे. जे काही न समजता आमची मदतच करत आहेत. आणि या बंद रस्त्याने सर्वात जास्त प्रत्येक दिवशी ५०० दशलक्ष डॉलरचे नुकसान त्यांचेच होत आहे! अमेरिकेचे यातून काही नुकसा होत नाहीए.’

त्यांनी सांगितले की वास्तविक अनेक जहाज या वेळी अमेरिकेच्या टेक्सास, लुइसियाना आणि अलास्काच्या दिशेने जात आहेत. जेथे ते लोडिंग करत आहेत. हे सर्व IRGC च्या मुळे होत आहे.जे नेहमी ताकतवान दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

आम्ही निष्पक्ष आणि योग्य प्रस्ताव ठेवत आहोता – डोनाल्ड ट्रम्प

ट्रम्प म्हणाले की आम्ही एक खूपच निष्पक्ष आणि योग्य समझोता सादर करत आहोत आणि मला आशा आहे की ते यास स्वीकार करतील, कारण जर त्यांनी असे केले नाही तर अमेरिका इराणच्या प्रत्येक एक पॉवर प्लाट आणि पुलाला उद्धवस्त करु, आता आणखी सहन केले जाणार नाही. ते लवकरच सहज शरण येतील आणि आता ती वेळ आली आहे की इराणच्या किलिंग मशीनचा अंत व्हावा !

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मला झालमुडी खायला द्या… बंगालमधील निवडणूक प्रचारादरम्यान PM मोदींची थेट दुकानात एन्ट्री
  • Chanakya Niti : या दोन गोष्टीला जे लोक भीतात ते आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत, चाणक्य नीती काय सांगते?
  • Chanakya Niti : या पाच ठिकाणी कधीच बोलू नका, गप्प बसण्यातच शहाणपण
  • Team India : श्रेयस अय्यर सूर्याची जागा घेणार;भारताचा कर्णधार बदलणार?
  • Bigg Boss Marathi 6 Finale : ‘बिग बॉस मराठी 6’च्या विजेत्याला काय काय मिळणार? रितेश देशमुखकडून खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in