• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : या दोन गोष्टीला जे लोक भीतात ते आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत, चाणक्य नीती काय सांगते?

April 19, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे त्या काळातील एक कुशल व्यवस्थापक देखील होते, व्यक्तीने आपल्या आयुष्याचं उत्तम व्यवस्थापन कसं करावं? याबद्दल अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. माणसाने आदर्श जीवन कसं जागावं? आपल्या आयुष्यात काय करावं? आणि काय करू नये? याबद्दल चाणक्य यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात अनेकदा असे कठीण प्रसंग येतात, अशा स्थितीमध्ये तुम्ही संयम सोडता कामा नये. जर तुम्ही संयम सोडला तर तुमचा पराभव निश्चित आहे. मात्र कसोटीच्या काळात जर तुम्ही संयम ठेवला तर तुम्हाला जगातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. पुढे चाणक्य असं देखील म्हणतात की कष्ट केल्याशिवाय माणसाला पर्याय नाही. तुम्ही जेवढे जास्त कष्ट कराल तेवढं जास्त तुम्हाला यश मिळेल. मात्र तुम्हाला आयुष्यात कधी न कधी अशा दोन गोष्टींचा सामना करावा लगतो, त्यावेळी मात्र न भीता त्याचा संयमाने सामना करा, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

अपयश – चाणक्य म्हणतात यश ही अपयशाची पहिली पायरी असते, त्यामुळे तुम्हाला जर एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आलं की घाबरून जाऊ नका, तुमचं काम तुम्ही मध्येच सोडू नका. एखाद्या गोष्टीमध्ये एकदा अपयश आलं म्हणजे तुमचा पराभव होत नाही. खरा पराभव तेव्हा होतो, जेव्हा दुसऱ्यांदा अपयशाच्या भीतीने तुम्ही ती गोष्ट पुन्हा करतच नाही. त्यामुळे तुमचं फार मोठं नुकसान होतं. त्यामुळे आयुष्यात काहीही झालं तरी कधीच अपयशाला घाबरू नका, तुमचे प्रयत्न सुरू ठेवा, एक दिवस तुम्हाला यश नक्की मिळणार आहे.

टीका – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये अपयश येतं, तेव्हा तुमच्यावर लगेचच टिका सुरू होतो. जे या टीकेला घाबरून कायमची माघार घेतात, असे लोक आपल्या आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत. या उलट जे लोक या टीकेला सकारात्मक घेऊन आपले प्रयत्न सुरूच ठेवतात, असे लोक एक दिवस आपल्या यशानं आपल्या टीकाकारांचे तोंड गप्प करतात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुम्हाला काय वाटतं CCTV तुमच्या सुरक्षेसाठी असतात? मग ही बातमी वाचाच, कॅमेरे घरातून काढून फेकून द्याल
  • यशाचा सिक्रेट मंत्र! चाणक्य नीतीमधील या 2 गोष्टींचे करा पालन; आयुष्य बदलेल
  • अक्षय तृतीयेला सोन्याचा भाव वधारला, तरीही तुफान खरेदी; एकाच दिवसात तब्बल… आकडा वाचून थक्क व्हाल!
  • GK : झुरळाचे रक्त लाल रंगाचे का नसते? नेमकं कारण वाचून नवल वाटेल!
  • SAW vs INDW : टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव, दक्षिण आफ्रिका 8 विकेट्सने विजयी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in